*उपसंपादक -- नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
दिनांक १४/११/२०२४ धनशैल्य विद्यालय, गिरझणी आणि किडझी अकलूज यांच्या वतीने बाल दिन साजरा करण्याबरोबरच मतदान जागरूकता आणि आय केअर शिबिराचे आयोजन क्रीडा संकुल अकलूज येथे करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगानाने झाली, ज्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी विजया पांगारकर, अकलूज नगर परिषदेचे मुख्य कार्य अधिकारी श्री. दयानंद गोरे, आणि पोलीस उपअधीक्षक श्री नारायण शिरगावकर उपस्थित होते.
प्रशालेतील प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून मतदानाचे महत्व आणि मुलांवरील अत्याचारविरुद्ध संदेश दिला. त्याचप्रमाणे, "केअरथॉन" रॅलीद्वारे प्रत्येक मुलासाठी सुरक्षित विश्व निर्माण करण्याचा आणि मतदानाचा संदेश दिला. पालकांनीही यात उत्साहाने सहभाग घेत, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
विद्यार्थ्यांनी विविध नृत्य आणि कला सादर केल्या, ज्यामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला.
प्रमुख पाहुण्यांनी सर्व मुलांना खाऊ देत बाल दिनाच्या शुभेच्छा दिल्या. धनशैल्य शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष सौ. पल्लवी गायकवाड यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच अकलूज नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी रोटरी क्लब अकलूजचे उपाध्यक्ष नवनाथ नागणे, सचिव मनिष गायकवाड, रोटरी क्लब सराटी डीलाईटचे सचिव महादेव पाटील, इनरव्हील क्लब अकलूजच्या अध्यक्षा शितल दळवी आणि सचिव मृणाल दोशी यांसह सर्व सदस्य उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा