*उपसंपादक -- नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
लेखक इंद्रजीत पाटील लिखित ' शेलक्या बारा ' या कथासंग्रहास आधार प्रतिष्ठान,बाेरगाव,ता.तासगाव,जि.सांगलीचा ' आधार साहित्य सेवा पुरस्कार - २०२४'जाहीर झाला.तसे पत्राव्दारे प्रा. सुनील लाड यांनी कळविले असून राेख रक्कम,सन्मानचिन्ह,शाल,श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या २२ डिसेंबरला बहारदार कार्यक्रमात लेखक इंद्रजीत पाटील यांना सन्मानित करण्यात येणारb आहे.अल्पावधीतच या कथासंग्रहास मिळालेला हा सहावा राज्यस्तरीय पुरस्कार असून लेखक इंद्रजीत पाटील आपल्या दर्जेदार लिखाणाच्या जाेरावर उत्तुंग भरारी घेत आहेत.त्याबद्दल श्री.माधवराव कुतवळ,जनसेवक अमाेल (भैया) कुतवळ, पंडितराव लाेहाेकरे,चंद्रकांत पाटील,भागवत उकिरंडे,संजय भड,अमाेल देशमुख,राकेश गरड यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.या गुणी लेखकाचे महाराष्ट्राभर काैतुक हाेत आहे.त्यांच्या 'चिबाड' या प्रकाशनाच्या मार्गावर असणाऱ्या कवितासंग्रहाची सर्वांनाच आतुरता लागून राहिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा