Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १३ डिसेंबर, २०२४

*"शेलक्या बारा" या कथासंग्रहास - 'स्पंदनचा पुरस्कार' जाहीर*


 

*उपसंपादक -- नूरजहाँ शेख*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

लेखक इंद्रजीत पाटील लिखित शेलक्या बारा या कथासंग्रहास स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट,डाकेवाडी ( काळगाव),जि.सातारा येथील पुरस्कार जाहीर झाला आहे.अल्पावधीतच प्रकाशझोतात आलेल्या या कथासंग्रहास यावर्षीचा हा पाचवा राज्यस्तरीय पुरस्कार असून कराड याठिकाणी येत्या २१ डिसेंबरला लेखक इंद्रजीत पाटील यांना सन्मानित करण्यात येणार आहे.स्व.राजाराम (तात्या) डाकवे राज्यस्तरीय पुरस्काराने या कथासंग्रहाचा गाैरव हाेणार असून लेखक इंद्रजीत पाटील यांची ' कळ पाेटी आली आेठी' कवितासंग्रह व 'शेलक्या बारा ' हा कथासंग्रह ही दाेन्ही पुस्तके महाराष्ट्रातील अनेक पुरस्कारास पात्र ठरत आहेत.त्याबद्दल श्री. पंडितराव लाेहाेकरे,चंद्रकांत पाटील,संजय भड,अमाेल देशमुख,राकेश गरड यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.त्याचबरोबर कवी इंद्रजीत पाटील यांचा बहुचर्चित ' चिबाड ' हा कवितासंग्रहही प्रकाशनाच्या मार्गावर आहे.त्यामुळे दर्जेदार लिखाण करणाऱ्या या साहित्यिकाचे सर्वत्र काैतुक हाेत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा