*सोलापूर-- प्रतिनिधी*
*आंबिद---बागवान*
*टाइम्स 450न्यूज मराठी*
शासकीय बंदी प्लॅस्टिक असताना ही सोलापूरात अंदाजे ६ ते ८ टन इतका प्लॅस्टिक साठा जप्त करून व्यापाऱ्या कडून १० हजाराचा दंड वसूली करण्यात आली.
सो.म.पा.च्या घनकचरा व्यवस्थापनाकडून प्लास्टिक जप्तीची मोठी कारवाईमुळे शहरातील व्यापारी खडबडून जागे.....
सोलापूरात चौपाड जुने विठ्ठल मंदिर येथे प्लास्टिक व्यापाऱ्याच्या गोडाऊनमध्ये महापालिकेच्या मुख्य आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षक यांनी अचानक धाड टाकून शासनाने बंदी केलेल्या प्लास्टिकचा अंदाजे ६ ते ८ टन इतका साठा जप्त करण्यात आला व संबंधित व्यापाऱ्याकडून दहा हजाराचा दंड वसूल करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या प्लास्टिकची किंमत सुमारे पाच लाख इतकी आहे. अचानक टाकण्यात आलेल्या या धाडीमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सोलापूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून शहरातील व्यापारी व नागरिक यांना वेळोवेळी जाहीर आवाहन व प्रसिद्धीकरण देऊनही शहरात मोठ्या प्रमाणावर बंदी घालण्यात आलेली प्लास्टिकची विक्री खुलेआम सुरू असल्याचे निदर्शनास आल्यामुळे मा. आयुक्त शीतल तेली-उगले यांचे आदेशानुसार व मा. अतिरिक्त आयुक्त रवि पवार यांचे मार्गदर्शनाखाली व मा. सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांचे नियंत्रणाखाली संपूर्ण शहरात घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील मुख्य आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षक यांचेकडून ही मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे.
सदर कारवाई हा अतिरिक्त आयुक्तांच्या समक्ष मुख्य सफाईचे अधिक्षक नागनाथ बिराजदार, मुख्य आरोग्य निरीक्षक नागनाथ मेंडगुळे, सुर्यकांत लोखंडे, बाबासाहेब
इंगळे,आरोग्य निरीक्षक राजशेखर वनारोटे, विठोबा शिंदीबंदे, सुनील राठोड, शेषराव शीरसट यांच्या सोबत घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील कर्मचारी यांनी ही कारवाई केली.
या वेळी शहरातील नागरिकांना व व्यापाऱ्यांना शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिकचा उत्पादन, वापर, विक्री, हाताळणी, वाहतूक व साठवणूक करू नये व वापरताना आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार दंडात्मक तसेच फौजदारी स्वरुपाची कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा मा. अतिरिक्त आयुक्त रवि पवार यांनी दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा