*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
मुलगी झाल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी वाघमोडे व मदने या दोन्ही परिवार यांनी मुलीच्या जन्माचे स्वागत धुमधडाक्यात करत आनंदोत्सव साजरा केला आहे.समाजाला एकीकडे स्त्री भ्रूण हत्येसारखा कलंक लागलेला असताना.दुसरीकडे अशा प्रकारे सकात्मक आणि आदर्श पावलंही उचलली जात आहेत.
सोलापूर जिल्ह्यतील माळशिरस गावात साठ फाटा पाटील वस्ती येथील बापू एकनाथ वाघमोडे यांची मुलगी सौ.रूपाली व झंजे वस्ती येथील पोपट मदने यांचे चिरंजीव दिपक यांना पहिल्यांदा मुलगी झाल्याने तिचे एक अनोख्या पद्धतीने स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
एक चिमुकली पाहुणी म्हणून घरात येणार होती.तिच्या स्वागताला घरातील सर्वजण जणू आसुरलेले होते. सकाळपासून लोक या चिमुकलीच्या आगमनाची वाट पाहत होते.ही नवीन पाहुणी दुसरी-तिसरी कुणी नसून जन्मलेली त्या घरची लेक होती. आपल्या तान्हुल्या लेकीच्या स्वागतासाठी तिच्या घरातील महिलांनी सडा व रांगोळी घालून दारातून फुलांच्या पायघड्या घालत व फटाक्यांची आतषबाजी करत तिचे जोरदार स्वागत करण्यात आले.दिपक आणि रूपाली यांच्या पोटी एक कन्यारत्न जन्माला आलं.दिनांक १२ डिसेंबर २०२४ या दिवशी मुलीने जन्म घेतला.मुलगी जन्माला आल्याचा आनंद या दाम्पत्याच्या गगनात मावत नव्हता.दवाखान्यातून घरी आणत असताना तिचे जंगी स्वागत समारंभ करण्याची योजना या जन्मदात्यांनी आखली.त्यांच्या या आनंदात घरातील सर्वांनी साथ देवून हिरहिरीने भाग घेतला होता.एका नवजात मुलीच्या स्वागताची अशी तयारी म्हणजे स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधातील एक सकारात्मक पाऊलच म्हणावे लागेल.
नवजात मुलीच्या आई-वडिलांना झालेला आनंद अवर्णनीय होता.ज्या गावात मुलीच्या जन्मानंतर नाक मुरडली जायची.त्या गावात मुलीच्या जन्माचे भव्यदिव्य स्वागत झाले. हा बदल समाजमनाला नवी दिशा देणारा ठरणार आहे. माळशिरस गावातला हा स्वागत सोहळा महाराष्ट्राला अनुकरणीय ठरावा असा आहे.असं झाले तर संपूर्ण महाराष्ट्रात *" लेक वाचवा*" * अभियानाला खऱ्या अर्थाने गती येईल.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा