किचन किंग
सिंहासनावर ऐटीत बसून
खुदकन म्हणाला हसून
रुबाब माझा लई वाढला
किचन किंग मी लसूण !!.
घरधण्याने बाजार आणला की गृहिणी बघते पिशवीत आधी
मी आहे की नाही हे तपासून
अलगद घेते आधी मला उचलून !!
वापरते मला जपून जपून
हातात घेऊन म्हणते मला
नाही रे चव आणि खमंग
सुवास तुझ्या वाचून !!
न्हवती माझी किंमत लोकांना तेव्हा यायचो घरो घरी मी किलो किलोने आता येतो पावशेर छटाकात ही ऐटीत बसून !!
भाव नाही म्हणून शेतकऱ्यांन मला कमी पीकवलं
महागाईच संकट हे बळीराजाच्या पिकांना हमीभाव नाही म्हणूनच आलं !
अन्नधान्याविना तुम्ही जगणार कसे ? याची कल्पना थोडी करा
जगला शेतकरी तरच जगेल देश
हा विचार थोडा तरी करा !!
नूरजहाँ फकृद्दीन शेख
गणेशगांव
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा