*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
माळशिरस तालुक्यातील पुर्व भागातील पायरीचा पूल तांबवे येथील सुप्रसिध्द एकमुखी दत्त मंदिरात आ.सुभाष बापू देशमुख यांच्या शुभहस्ते आरती करण्यात आली.विशेष म्हणजे मुंबईत विधानसभेत आमदारकीची शपथ घेतल्या नंतर सोलापूर जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर प्रथम या मंदिरातील दत्तांचे दर्शन घेतले.
आ.सुभाष देशमुख यांची विधानसभेत आमदार म्हणून जाण्याची तिसरी वेळ आहे.सध्या केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यामुळे नवीन मंत्रीमंडळात आ.देशमुख यांना मंत्रीमंडळात स्थान देऊन सोलापूर जिल्हाचे पालकमंत्री करावे.अशी भावना येथील दत्त भक्तांनी केली आहे.पायरीचा पूल येथील एकमुखी दत्त मंदिराची प्रचिती हळूहळू सोलापूर जिल्ह्यात होत असून जिल्ह्यातून दत्त भक्त या मंदिरात दर्शनासाठी येत आहेत
.
आ.सुभाष देशमुख यांचे औक्षण पूनम साळुंखे यांनी केले त्यानंतर त्यांचा सन्मान शाल,हार,श्रीफळ देऊन करण्यात आला.यावेळी दत्त मंदिरचे विश्वस्त आबासाहेब साळूंखे व लोकमंगलच्या संचालिका ह.भ.प.सौ.पूनमताई साळूंखे,माजी ज़िल्हा परिषद सदस्य संभाजी जाधव घोगाणे,मार्केट कमिटीचे संचालक बापु तात्या मुंडफणे, यमाई सोसायटीचे चेअरमन महादेव चव्हाण,आदर्श शिक्षक समीर लोणकर गुरुजी,सत्कार हॉटेलचे रणजित सुसलादे,आदेश भांबुर्डीकर,विवेक देशमाने,आबा पताळे,आबासाहेब जाधव,आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा