Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ११ डिसेंबर, २०२४

नेवरे (माळशिरस) येथे बिटस्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न .


 

*उपसंपादक -- नूरजहाँ शेख*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्र शाळा नेवरे येथे बिटस्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या.सदरील स्पर्धेमध्ये अकलूज बिटमधील सहा केंद्राचा सहभाग होता.यामध्ये बाभूळगाव जिल्हा परिषद शाळेने अतिशय रोमांचक व चुरशीच्या झालेल्या लंगडी स्पर्धा व खो खो स्पर्धा या दोन्ही क्रीडा प्रकारामध्ये प्रथम क्रमांक मिळवून तालुकास्तरीय स्पर्धेसाठी दोन्ही संघ पात्र ठरले आहेत.विशेष म्हणजे लंगडी संघाने सलग तीन सामने खेळून फायनलमध्ये एकही सामना न खेळून फायनलमध्ये गेलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लवंग केंद्र महाळुंग या शाळेवर दिमाखदार विजय मिळवला.

       सर्व विजयी खेळाडूंचे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी अभिनंदन करून व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा