Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ५ डिसेंबर, २०२४

*माळशिरस चे आमदार -"उत्तमराव जानकर "आणि मारकडवाडीचे सरपंच रणजीत मारकड यांच्यासह ८९ जाणार गुन्हा दाखल*


 

*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448*

ईव्हीएम मशीन संदर्भात अफवा पसरवून फेर मतदानाची तरतूद नसताना प्रशासनाचा जमावबंदी आदेश झुगारुन जमाव जमवल्या प्रकरणी नातेपुते पोलिसांनी आमदार उत्तमराव जानकर, मारकडवाडीचे सरपंच - रणजित मारकड, अजय सकट, भानुदास सालगुडे पाटील, स्वप्नील वाघमारे, आप्पा देशमुख आदींसह स्थानिक व माळशिरस तालुक्यातील ८९ जणांवर मंगळवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला. असल्याची माहिती नातेपुते पोलिसांनी दिली असून बुधवारी उशीरापर्यंत कोणालाही अटक

केलेले नसल्याचे पोलिस सहाय्यक निरीक्षक महारुद्र परजणे यांनी सांगितले.

मारकडवाडी (ता. माळशिरस) ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीतील आमदार उत्तमराव जानकर यांच्या विरोधातील मताधिक्याची खातरजमा करून घेण्यासाठी मंगळवार, दि.३ डिसेंबर रोजी गाव पातळीवर बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी मतदानाची तयारी केली होती. अखेरच्या क्षणी प्रशासनाने जमावबंदी आदेश करून ग्रामस्थांचा हा निर्णय हाणून पाडला.


*गावाला आले होते पोलिस छावणीचे स्वरुप*



मारकडवाडी येथे आपण केलेल्या मतदानाची शहानिशा करण्यासाठी आपल्या गावात आपसात फेरमतदान व तेही बॅलेट पेपरवर घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र प्रशासनाने परवानगी नाकारली होती. पोलिसांनी २२ जणांना नोटीस बजावून जमावबंदी लागू केली. २४०५ मतदारांपैकी २५० ते ३०० मतदार मतदान स्थळी आले होते. नाहक वाद निर्माण होईल म्हणून मतदान प्रक्रिया स्थगित केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा