*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन उमरगात उत्सवात साजरा करण्यात आला.
3/12/2024 रोजी जागतिक अपंग दिनानिमित्त विविध प्रकारचे दिव्यांग जन उमरग्यात 11 वाजता होतो हुतात्मा स्मारक येथे जमा झाले होते त्यात अपंग, गतिमंद ,अंध, मुकबधीर, इत्यादी प्रकारचे दिव्यांग जन मेळाव्यात आले होते.त्यात निवासी मूकबधिर विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक वृंद व कर्मचारी होते तसेच अपंग शाळा सास्तुरचे विद्यार्थी ही आले होते प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष ईसाक शेख व त्याच्या टीमने हा कार्यक्रम आयोजित केला होता रॅली हुतात्मा स्मारक पासून हलगी व फटाके यांचा नाद करीत रॅली निघाली होती छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार भगवान वाघमारे सर व रामेश्वर मदने तालुकाअध्यक्ष यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अपंग दिनाच्या जयकार जयकार केला व मूकबधिर विद्यालयाचे विद्यार्थी यांनी लेझीम पथकातून जनतेचे लक्ष वेधून घेतले हे पथक निर्मिती करणारे शाळेचे मुख्याध्यापिका भावना नानजकर मूकबधिर लेझीम पथक निर्माण केले होते उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार माननीय प्रवीण स्वामी सर गुरुजी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते पुढे जाऊन अण्णाभाऊ साठे चौक येथे येऊन चौकात झेंडावंदना पुष्पहार घालून पुढे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ येऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास जिल्हाउपाध्यक्ष यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले व रॅली पुढे श्रीराम मंगल कार्यालय येथे येऊन सर्व दिवंग बांधवांनी भोजनाचा आस्वाद घेतला. हेलन केलर यांच्या फोटो प्रतिमेचे पूजन जिल्हाउपाध्यक्ष ईसाक शेख व भगवान वाघमारे व त्यांच्या टीमनी केले व भगवान वाघमारे यांनी मार्गदर्शन केले व राहुल मन्नाडे फारुख बागवान सोहेल जमादार तोफिक शेख लक्ष्मण गायकवाड नागराज मसरे स्वामी बसवराज शिवया इत्यादींचा इत्यादीचा कार्यक्रम यशस्वी करण्यात व सहभाग नोंदिवला पोलीस उपनिरीक्षक भराटे साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रम व्यवस्थित पार पडला व सहकार्य केले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा