Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ६ डिसेंबर, २०२४

*संविधानाचा सन्मान हीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खरी आदरांजली --सुरज वनसाळे*


 

*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी -

टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:--  8378081147*

शुक्रवार दि.६ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता नऊदारे येथील "मी आंबेडकरवादी" सामाजिक संघटनेच्या कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली.

              यावेळी अभिवादन पर बोलताना *"मी आंबेडकरवादी" सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरज वनसाळे म्हणाले की, देशात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे शांतता नांदत आहे व नांदणार आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधान यामुळे हे शक्य झाले आहे. त्यामुळे संविधानाचा सन्मान राखणे हीच खरी आदरांजली भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना होईल.



          यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन जंक्शन चे उद्योगपती विष्णू माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी "मी आंबेडकरवादी" सामाजिक संघटनेचे राजशिष्टाचार समितीचे सदस्य आप्पासाहेब कदम, मिलिंद भोसले, बबलू वंचाळे, निलेश फलफले, किरण गायकवाड, क्षितीज वनसाळे, यश मोरे व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा