Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ६ डिसेंबर, २०२४

*व्हाईस ऑफ मीडियाच्या डिजिटल विंग च्या धाराशिव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा संपन्न* *"राहील पटेल" यांची उमरगा तालुका सचिवपदी निवड*


 

*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:--  9730 867 448*

उमरगा तालुका व्हाईस ऑफ मीडियाच्या डिजिटल मीडिया  सचिव पदी राहील पटेल यांची निवड करण्यात आली  डिजिटल मीडिया विंगचा पदग्रहन सोहळा नुकताच संपन्न झाला याप या पदग्रहण सोहळ्यास

प्रदेशाध्यक्ष हर्षद लोहार यांची प्रमुख उपस्थिती होती

जगभरातील ४७ देशात पत्रकारांचे संघटन करून पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडियाच्या डिजिटल विंगच्या धाराशिव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा पदग्रहन सोहळा शासकीय विश्रामगृहात नुकताच पार पडला.

यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षद लोहार, राज्य खजिनदार प्रवीण पावले, धाराशिव व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रमुख जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, डिजिटल विंगचे जिल्हाध्यक्ष जुबेर शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष हर्षद लोहार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आली.

अत्याधुनिक युगात पत्रकारितेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे किती गरजेचं आहे आणि जो पत्रकार याचं ज्ञान घेऊन पत्रकारिता करेल त्यालाच भविष्य असल्याचे डिजिटल विंगचे प्रदेशाध्यक्ष हर्षद लोहार यांनी सांगितले. तसेच त्यांनी AI कसे काम करते याचे प्रात्याक्षिकही सादर केले.

तसेच जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे यांनी संघनटनेचे आजवरचे काम आणि पुढील काळात संघटना काय काम करणार आहे याची माहिती दिली.



यावेळी मनोज जाधव यांनी जिल्हा कार्याध्यक्षचा,विशाल जगदाळे जिल्हा उपाध्यक्ष,सर्जेराव गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष,राम थोरात जिल्हा कार्यकारणी,जावेद शेख जिल्हा कार्यकारणी, सचिन तोग्गी तुळजापूर तालुकाध्यक्ष,अहमद अन्सारी तुळजापूर कार्याध्यक्ष,सचिन शिंदे तुळजापूर तालुका सरचिटणीस,उमरगा तालुकाध्यक्ष बालाजी सारसाने,उमरगा राहील पटेल तालुका सरचिटणीस,शोएब काझी वाशी तालुकाध्यक्ष,तानाजी सुपेकर भूम तालुकाध्यक्ष, शहानवाज तांबोळी परंडा तालुकाध्यक्ष, तर प्रतीक वाघे यांनी तुळजापूर शहराध्यक्ष व येडशी येथील सुभान शेख यांना धाराशिव शहराध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज जाधव यांनी केले तर आभार जुबेर शेख यांनी मानले.यावेळी जिल्ह्याभरातून बहुसंख्येने पत्रकार उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा