Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ६ डिसेंबर, २०२४

*फिनिक्स इंग्लिश स्कूलमध्ये महामानवास विनम्र अभिवादन*


 

*अकलूज --प्रतिनिधी*

*केदार---- लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

लवंग २५/४ (ता.माळशिरस) येथील फिनिक्स इंग्लिश स्कूलमध्ये ज्ञानसूर्य,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पाहार घालून.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.   


 

             यावेळी मार्गदर्शन करताना फिनिक्स इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या नूरजहाँ शेख म्हणाल्या की, बाबासाहेबांनी शिक्षणाचे महत्त्व सांगताना म्हणाले होते की वाचाल तर वाचाल,शिक्षण हे वाघिणनीचे दूध आहे जो पितो तो गुरगुरल्याशिवाय रहात नाही तर शिका,संघटीत व्हा व संघर्ष करा या आदर्श विचारसरणीचा ज्ञानसूर्याच्या शिकवणुकीला विदयार्थ्यांनी आत्मसात केलेच पाहिजे फिनिक्स स्कूलमधील विद्यार्थ्यांनी सदैव वाचनाची आवड जोपासनण्याचा संकल्प करून महामानवास आदरांजली अर्पण केली.



             यावेळी महालक्ष्मी कृषी केंद्राचे चालक रणजित चव्हाण,जय किसान कृषी केन्द्राचे मॅनेजर संकेत मिसाळ, भारत सरवदे,कुंडलिक ठोकळे, अंश महा ई सेवा केंद्राचे चालक सागर ठोकळे,योगेश रेडे-पटील, गुलशन शेख,तमन्ना शेख उपस्थित होते.शाळेच्या संस्थापक अध्यक्षा नूरजहाँ शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा