Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ६ डिसेंबर, २०२४

लावणी सम्राज्ञी प्रमिला सूर्यवंशी (लोदगेकर)यांना भारत सरकारचा उस्ताद बिस्मिल्ला खान युवारत्न पुरस्कार प्रदान

 


*उपसंपादक --- नूरजहाँ शेख*

*टाइम्स ४५ न्यूज मराठी*

दि.22 नोव्हेंबर 2024 रोजी डॉ.आंबेडकर आंतरराष्ट्रीय भवन जनपथ रोड दिल्ली येथे श्री.गजेंद्र सिंग शेखावत (सांस्कृतिक व पर्यटन मंत्री भारत सरकार),श्री.अरुणीश चावला (सचिव सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार),डॉ.संध्या पुरेचा(अध्यक्ष संगीत कला अकॅडमी भारत सरकार), श्री.जोरावर सिंग जाधव (उपाध्यक्ष संगीत कला अकॅडमी भारत सरकार) यांचे शुभहस्ते भारत सरकारच्या नाट्यसंगीत अकॅडमीचा सन २०२२-२३ चा “उस्ताद बिस्मिल्ला खान युवारत्न पुरस्कार” लावणी सम्राज्ञी प्रमिला सूर्यवंशी (लोदगेकर) यांना प्रदान करण्यात आला.तसेच या पुरस्काराबरोबर अन्य राज्यातील विविध क्षेत्रातील कलाकारांना भारत सरकारच्या वतीने एकूण ८२ पुरस्कार प्रदान करण्यात आले.

       प्रमिला सुर्यवंशी (लोदगेकर) यांनी अकलूज राज्यस्तरीय लावणी स्पर्धेत सलग तीन वर्ष प्रथम क्रमांक मिळवून हॅट्रिक केली होती. अकलूज लावणी स्पर्धेचा मानाचा सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील लावणी कलावंत पुरस्कार,याचबरोबर गोवा येथे भास्कर भूषण यांचा प्राईड ऑफ इंडिया तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेचा लावणी कलावंत पुरस्कार अखिल भारतीय नाट्य परिषदेचा ही मानाचा पुरस्कार मिळाला.त्याचबरोबर अनेक पुरस्काराने प्रमिला लोदगेकर यांना सन्मानित करण्यात आले आहे.त्यांना भारत सरकारच्या वतीने चीन व दुबई येथे " महाराष्ट्राची लोक कला "या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राची पारंपारिक लावणी सादर करण्याचा मान मिळाला होता. आजही लावणी प्रशिक्षक व नवीन कलावंतांना मार्गदर्शन करण्याचे काम त्या करीत आहेत. 

        हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरावर अभिनंदनचा वर्षाव केलं जात आहे.प्रमिला लोदगेकर यांना पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल अकलूज लावणी स्पर्धेचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी त्यांचं विशेष कौतुक व अभिनंदन केलं आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा