Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २८ डिसेंबर, २०२४

*सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक 'मळोली शाखाधिकारी पदी- "संतोष उघडे"- यांची निवड*


 

*अकलूज --प्रतिनिधी*

*केदार---- लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खंडाळी शाखेत लिपिक पदावर काम करीत असलेले संतोषकुमार उघडे यांचे मळोली शाखेत शाखाधिकारी म्हणून नियुक्ती झाली.ते १९९७ पासून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सेवेत लिपिक पदावर कार्यरत होते.यापुर्वी त्यांनी निमगाव (म.),खुडूस,वेळापूर,बोंडले, खंडाळी या शाखेत काम केले आहे त्यांचे कामकाज पाहून वरिष्ठांनी त्यांची पदोन्नती केली. यावेळी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आभार मानले. त्यानिमित्त त्यांचा खंडाळी शाखेत सन्मान करण्यात आला. यावेळी सरपंच बाबुराव पताळे, सोसायटी चेअरमन नामदेव पताळे,सुभाष पताळे,खंडाळी शाखेचे शाखाधिकारी व्ही.बी. पवार,बॅंक इन्स्पेक्टर गेजगे सो,लिपिक वसुंधरा इंगवले देशमुख मॅडम,संतोष मोरे,अण्णा मोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा