Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ७ डिसेंबर, २०२४

*राहुल गांधीं काढणार मारकडवाडी मधून लाँग मार्च* *मारकडवाडीला 'शरद पवार' ही भेट देणार* *ईव्हीएमविरोधात मारकडवाडीत पडलेली ठिणगी देशभर वणवा पेटवेल : उत्तम जानकर!*


 

*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:--  9730 867 448*

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल २३ नोव्हेंरबला जाहीर झाले. या निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले, यावरुन आता विरोधक राज्यभरात ईव्हीएम मशीनवर आक्षेप नोंदवताना दिसत आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी सोलापुरातील मारकडवाडीत बॅलेट पेपरवर चाचणी मतदान करण्याचा निर्णय गावक-यांनी घेतला होता. मात्र प्रशासनाकडून ही मागणी फेटाळण्यात आली. त्यातच आता काँग्रेस नेते राहुल गांधी हे मारकडवाडीतून ईव्हीएम विरोधात लाँग मार्च काढणार आहेत.



सोलापुरातील माळशिरसमध्ये मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी ईव्हीएम मशीनच्या मतदानावर आक्षेप घेतला त्यांनी एक्झिटची सत्यता तपासण्यासावी थेट मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा ठराव केला. या घटनेने राज्यसह देशभरात मारकड़वाडी हे गाव चर्चेचा विषय ठरले होते. ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी तहसीलदारांनी सहकार्य करावे, अशी

विनंती मारकडवाडीचे सरपंच व्ही. जी. मारकड यांनी केली होती. मात्र ही .मागणी प्रशासनाने फेटाळली होती. यानंतर माळशिरसचे नवनिर्वाचित आमदार उत्तम जानकर यांनी बैलेट पेपरवरील मतदान करण्याचा निर्णय मागे घेत असल्याचं जाहीर केले. प्रशासन सहकार्य करत नसल्यामुळे हा निर्णय घेत असल्याचे ते म्हणाले.



*ईव्हीएम विरोधात सर्वत्र संताप*


यानतंर आता सोलापुरातील  मारकडवाडीतून एक मोठा लाँग मार्च काढला जाणार आहे. हा लाँग मार्च 'ई व्ही एम' विरोधात असणार आहे.

यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थितीत राहणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माळशिरस चे आमदार उत्तम जानकर यांनी दिली आहे. 

काही दिवसांपूर्वी सोलापुरात महाविकास आघाडीकडून ईव्हीएम मशीन फोडून जाळत आंदोलन करण्यात आले. यावेळी सोलापुरातील ईव्हीएम विरोधी कृती समितीने आंदोलनाची हाक दिली होती. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे नेतेही आंदोलनात सहभागी झाले होते.


*वंचित बहुजन आघाडी कडूनही जनआंदोलनाची हाक*


वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात एष्ट विरोधी जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्प्याटप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यानुसार येत्या ३ ते १६ डिसेंबरपर्यंत राज्यात ईव्हीएमविरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे.


*ईव्हीएम मशीनची प्रतिकृती जाळण्याचा प्रयत्न*


या आंदोलनावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ईव्हीएम मशीनची प्रतिकृती फोडण्याचा तसेच जाळण्याचा प्रयत्न केला. त्यातच आता काँग्रेस नेते खासदार पेटवेल, असा विश्वास माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी व्यक्त केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा