*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
नुकतीच महाराष्ट्र विधानसभेची २८८जागांसाठी निवडणुक झाली .व अनाकलनीय निकाल लागुन भाजप प्रणीत युतीला स्पष्ट राक्षसी बहुमत मिळाले यामधे अनुक्रमे १३२+५७+४१ =२३०व अपक्षाचे पाठबळ मिळुन हा आकडा वाढु शकतो या पाशवी बहुमतामागे दोन्ही बाजुकडुन प्रचारात फेकलेले काही नेरेटीव्ह, लाडकी बहीण अनुदान सारख्या काही सवंग घोषणा ,तर काही प्रमाणात ए व्ही एम बद्यलचा मतदारांमधील साशंकता , असल्याने आयोग व दोन्ही सरकारे संशयाच्या भोवऱ्यात ,आरोपात सापडली ,लोकशाही धोक्यात असल्याचे चित्र निर्माण झाले. तक्रारींच्या तपासानंतर दुध का दुध .. पाणी का पाणी..होईलच पण आजवरच्या महाराष्ट्रा च्या इतिहासात मतदान प्रक्रीया ,पैशाचा महापुर, कधीही पाहिला नसेल यावेळी प्रत्येकास माजी निवडणुक आयुक्त कै.टी एन शेषन यांची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही.ही निवडणुक युती आघाडीत मुख्यमंत्री कोण होणार ? या एकाच मुद्यावर केंद्रीत झाली व यामुळेच आघाडीत पडझड झाल्याची चर्चा आहे पाशवी बहुमत मिळुनही युती मध्ये ,सरकार मध्ये मुख्यमंत्री निवडीला १३दिवस लागले मित्रपक्षातील वाद सत्तापदांवरुन हेवेदावे, मुंबई दिल्ली नेत्यांच्या वाऱ्या होऊनही स्थिती जैसे थे अशीच होती २६नोव्हेंबरला मुदत संपुनही राज्यात काळजीवाहु सरकारच राहीले राष्ट्रपती राजवट लागु झाली नाही सत्ता पैसा पद या भोवतीच सर्व स्तरावर लाचारी व कायदा गुंडाळल्याचे चित्र पहावयास मिळाले वास्तविक या निवडणुकीच्या खेळात खऱ्या अर्थाने शिवसेना वर्ग१ मध्ये एकनाथ शिंदे तर शिवसेना वर्ग २मध्ये .उद्धव ठाकरे हेच दोन्हीकडे मुख्यमंत्री पदाचे अलिखित उमेदवार होते हे मतदार जाणुन होता, पण फासे उलटे पडत गेले सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष असणाऱ्या भाजप मध्ये शिंदे गटाला अडगळीत टाकण्याचे षडयंत्र .अजितदादा गटाला भाव देऊन ,हाताशी धरुन सत्ताधाऱ्यांनी डाव साधला शिंदे सेनेतील वाचाळ विरांची बोलती बंद झाली. ठाकरे ..शिंदे प्रकरणाची ऐतिहासिक पुनराव्रुत्ती करण्याची वेळ आली ED CBI ,व शिंदे पक्षात घेऊन भाजपच्पा १३आमदारांचे व अन्य खुर्ची सम्राटांच्या मदतीने पक्ष फोडण्याचा डाव शिंदे प्रमाणे अजित दादांनाही आहे हे विसरु नये पक्ष व चिन्ह फोडुन काकांना व ठाकरेंना दिलेल्या दौनही उपमुख्यमंत्र्याच्या कारस्थानाची पुन्हा लवकरच पुनराव्रुती होणार हे भाजपचे तंत्र ओळखण्यास कोणा भविष्यवाणी करणाऱ्याची गरज नाही .राज्यपातळी वरील पक्ष संपवणे हेच भाजपच धोरण पुर्वी प्रमाणेच असून पवार व ठाकरे यांच्या पक्ष विभाजनाने संपवण्या प्रमाणेच शिंदे व दादांच्या पक्षाने सावध राहुन पर्याय आतापासुनच शोधणे गरजेच आहे अन्यथा पक्ष कुठय हे पहाण्यासाठी दुर्बिणी ची गरज असणार आहे ही काळ्या दगडावरची रेघ आहे. " Use and throw"अशी अवस्था..पक्षाची रहाणार आहे " जागे व्हा सत्ते पेक्षा स्वाभिमान जागृत ठेवा.अन्याय करणाऱ्यापेक्षा तो अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो निवडणुकीच्या रिंगणातील "आम्ही रडणारे नाही ....लढणारे आहोत "ही सिंहगर्जना विसरलात तुमचा झालेला बंद खोलीतील मान अपमान तुम्हीच जाणता ? पण शपथ विधी प्रसंगी ठरवुन केलेल्या पंतप्रधानांनी चिटकुन जवळुन जाऊनही न पहाणे,नमस्कार करताना तोंड वळवणे, बैठक अलग ठेवणे,दोन्ही निमंत्रण पत्रिकेतुन नाव वगळणे आजारपणात येऊन वरीष्ठानी साधी विचार पुस ही न करणे आणखी कीती अपमानीत होणार ? "शिवसेनेचा वाघ" व बछडे जिवंत असल्याच हे लक्षण नाही
(. एकनाथ जी शिंदे यांना तुकाराम.ग. उबाळे मोबा.९५६१२९२०००/७२१८२४९००० या हितचिंतकाचे अंत:करणापासुनचे पत्र )




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा