*विशेष प्रतिनिधी --एहसान मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो.9096837451*
सोलापुरात 10 डिसेंबर रोजी मानवाधिकार दिनानिमित्त समाज कल्याण हॉल रंगभवन येथे मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने मानवाधिकार दिन साजरा करण्यात आला.
यावेळी .
मानव अधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कामगार नेते विष्णू करामपुरी महाराज होते.
कार्यक्रमात प्रमुख मान्यवर म्हणून एस.आर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष साहिल भाई रामपुरे,पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार, वाहतूक संघटना संयुक्त महासंघचे संस्थापक अध्यक्ष रियाज सय्यद, अखिल भारतीय जनजागृती संघटनांचे प्रदेश अध्यक्ष इब्राहिम जमादार, ज्येष्ठ पत्रकार अन्सार तांबोळी उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात बागवान सोशल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष जुबेर भाई बागवान यांना आदर्श समाजसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांच्या हस्ते जुबेर बागवान यांना देण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अखेर मानवाधिकार संरक्षण संघटनेचे सादिक शेख यांनी कार्यक्रमाचा आभार व्यक्त केला.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी महबूब कादरी, प्रवीण चांदेकर, परवेज मुल्ला, अकबर शेख, मीर महंमद खान, मुर्तुज शेख, मोहसीन बागवान व मानवाधिकार संरक्षण संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथ्थक परिश्रम घेतले..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा