*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री निळकंठेश्वर विद्यालयाच्या २००२ च्या दहावी च्या बॅचचे स्नेहसंमेलन बारामती येथील बारामती क्लब ला रविवार दिनांक २९ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता उत्साहात संपन्न झाले. विशेष म्हणजे सलग तीन वर्षे स्नेहसंमेलन वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केले जात आहे
यावेळी श्री निळकंठेश्वर विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आर.आर. कदम सर, व विद्यमान मुख्याध्यापक आर.डी. लोंढे सर हे दोघे कार्यक्रमाच्या संयुक्त अध्यक्ष पदी होते. तर सौ.मंदाकिनी रमेश लोंढे, व सौ.रेखा रघुनाथ कदम या प्रमुख पाहुण्या होत्या.
पैशाला न महत्त्व देता शिक्षणाला द्या. मुलांना शिक्षणाबरोबरच शिस्त लावा. तरच तुमच्या मुलांचे उज्ज्वल भविष्य घडेल असे उद्गार अध्यक्षपदावरून बोलताना लोंढे सर यांनी काढले तर आनंदी जीवन जगण्यासाठी स्नेहसंमेलन होणे काळाची गरज असुन मित्रांमुळे आयुष्य वाढते. सर्वांनी एकत्र येऊन सामाजिक उपक्रम राबविले पाहिजेत. असा संदेश कदम सरांनी दिला. यावेळी प्रा. मंदाकिनी लोंढे मॅडम व अनेक विद्यार्थ्यांची मनोगते झाली.
तत्पूर्वी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले तसेच राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुत्रसंचलन सुरज वनसाळे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन लोंढे, सिध्देश्वर राऊत, संदिप लोंढे, अमोल सुर्यवंशी, दत्तात्रय लोंढे यांनी प्रयत्न केले.
या बॅचमध्ये अनेक उद्योगपती, अधिकारी, शिक्षक, कंपनी कामगार, बागायतदार , राजकारणी आहेत , लहान मोठे व्यावसायिक आहेत मात्र सर्वांनी खुप धमाल केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा