*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी -
टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 8378081147*
----- परभणी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधान प्रतिकृतीची विटंबना प्रकरणी बावडा शंभर टक्के बंद पाळण्यात आला. समस्त नवबौद्ध समाज बांधवांच्या वतीने बावडा बंदचे आयोजन करण्यात आले होते.
परभणी येथील परमपुज्य डॉ बाबासाहेब आबेडकाच्या पुतळ्यासमोर ठेवलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्यात यावी. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे इत्यादी महापुरुषांच्या व संतांच्या आधुनिक महाराष्ट्र भूमीत विटंबने सारखे प्रकार घडावेत ही नामुष्कीची गोष्ट असून समाजकंटकावर कायमचा जरब बसवणे आवश्यक आहे. त्यासाठी अशा घटनेतील समाजकंटकावर जास्तीत जास्त कठोर कारवाई करण्यात यावी या मागण्यासाठी बावडा नवबौद्ध समाजाच्यावतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यास व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांनी शंभर टक्के प्रतिसाद देत बंद यशस्वी केला.
सदर निवेदनाच्या प्रति तहसीलदार जिवन बनसोडे, पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे, सरपंच ग्रामपंचायत बावडा व व्यापारी व व्यावसायिक यांना देण्यात आले होते. निवेदनावर विशाल सुधाकर कांबळे, सागर पोपट कांबळे, अनिल विनायक कांबळे, अश्वजित कांबळे, दादासो बाळासाहेब कांबळे, विकास अशोक गायकवाड, शुभम राजेंद्र कांबळे आदिंसह समाज बांधवांच्या सह्या आहेत.
-----------------






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा