Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १४ डिसेंबर, २०२४

तरुणांनी व्यसनाधीनता सोडून भगवंत चरणी नतमस्तक होऊन परमार्थ करावा. व्यसन मुक्तीने चांगले संस्कार घडतात, - गुरूवर्य बंडातात्या कराडकर


 

*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी

 -टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:--  8378081147*

व्यसनाधीनता ऐवजी भक्ती मार्गाने परमार्थ करा - गुरुवर्य बंडातात्या कराडकर 


----- तरुणांनी व्यसनाधीनता सोडून भगवंत चरणी नतमस्तक होऊन परमार्थ करावा. व्यसन मुक्तीने चांगले संस्कार घडतात, त्यामुळे पुढची पिढी निरोगी होवून भक्ती मार्गाला लागेल असे भावोद्गार संतवीर बंडातात्या कराडकर यांनी काढले.

     पिंपरी बुद्रुक येथे श्री गुरु बापूसाहेब देहुकर व गुरुवर्य सोहम महाराज देहुकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात ८० वर्षाचा योद्धा गुरुवर्य बंडातात्या कराडकर यांची कीर्तन सेवा झाली.



     गुरुवर्य बंडातात्या कराडकर बोलताना पुढे म्हणाले की, व्यसनाधीनता सोडल्याने पती-पत्नीत भांडण न होता संसार सुखाचा होतो. जीवन चांगले व संस्कारमयी होते. 

लहान वयातच चांगले विचार व संस्कार दिल्याने जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. जीवनामध्ये परमार्थ आणि नामाची सांगड मनापासून घातल्यास धार्मिक क्षेत्रात शिदोरीची सांगड आयुष्यभर मनामध्ये राहते. 



    ज्या माणसाने आयुष्यभर जीवाच रान करून भगवंताच नामस्मरण व सतत परमार्थ साधत राज्यामध्ये व्यसनमुक्ती संघटनेच्या माध्यमातून लाखो तरुण व्यसना पासुन मुक्त झालेले आहेत. वयाच्या ८० व्या वर्षी सुद्धा देहू ते पिंपरी बुद्रुक २०० किलोमीटरचा प्रवास करून अखंड हरिनाम सप्ताहाच्या किर्तन सेवेला हजेरी लावली. बंडातात्या कराडकर यांच्या कीर्तन सेवेसाठी २५० टाळकरी व चार हजारांहून अधिक भाविक भक्त व ग्रामस्थांनी हजेरी लावली. अखंड हरिनाम सप्ताहाचे सूत्रसंचालन महेश सुतार यांनी केले. 

फोटो - पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) येथे अखंड हरिनाम सप्ताहात कीर्तन सेवा बजावत असताना गुरुवर्य बंडातात्या कराडकर

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा