*उपसंपादक --- नूरजहाँ शेख*
*टाइम्स ४५ न्यूज मराठी*
आदम इव्हच्या काळापासून महंमद पैगंबरांपर्यंत अनेक प्रेषितांनी तयार केलेला हा ग्रंथ केवळ मुस्लिमांसाठी नसून अखिल मानव जातीसाठी आहे." असे प्रतिपादन डॉक्टर इकबाल मिन्ने यांनी केले. ज्येष्ठ नागरिक सभागृहात नसिमा फाउंडेशन पनवेल आयोजित ए.के. शेख अनुवादित 'दिव्य कुरआन'या पवित्र ग्रंथाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, "आयुष्याचा उद्देश काय हे शोधण्याचा संदेश कुरआनने दिला आहे. तसेच छत्रपती शाहू महाराजांनी प्रथम कुरआनाचे भाषांतर केल्याचा उल्लेख त्यांनी केला. मुफ्ती मोहम्मद रझी कडवाईकर यांनी आपल्या भाषणाद्वारे कुरआनाची पाच उपदेश तत्वे सांगितली. १.शरीराच्या हानी करणाऱ्या बाबी टाळा.२. दारू, जुगार हे सैतानाचे काम आहे, सबब त्यापासून दूर राहा. ३.आई-वडिलांचा आदर करा. त्यांना उलट उत्तरे देऊ नका. त्यांच्यावर मायेची पाखर घाला. ४.महिलांनी अंगभर कपडे परिधान करूनच वावरावे. तसेच पुरुषांची नजर खाली असावी. ५.गैरसमजाला थारा देऊ नका.
दूरदर्शनचे जावेद शेख आपल्या भाषणात म्हणाले," धर्मग्रंथ स्वतःच्या भाषेतून वाचला तर चांगला समजतो. कुराण हा ईश्वरनिर्मित ग्रंथ आहे. ए.के.शेख सरांनी त्याचे अचूक व सुलभ भाषांतर केले आहे. "
को.म.सा.प. पनवेल शाखेचे अध्यक्ष रोहिदास पोटे यांनी अनुवाद, भाषांतर व रूपांतर यातील फरक समजावून सांगितला. ए.के.शेख सरांनी एक तप परिश्रम करून कुरआनाचा
अनुवाद सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत केल्याचे प्रतिपादन केले. तसेच तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता ही सर्व धर्माचे सार असल्याचे नमूद केल्याची माहिती त्यांनी दिली.
गजल नवाज भीमराव पांचाळे म्हणाले," ए.के. शेख रसिकांचे शाहीर असून त्यांना गरिबांच्या दुःखाची जाण आहे. मराठी साहित्यातील गजलेचे दालन त्यांनी समृद्ध केले आहे."
पनवेल नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व वक्त्यांच्या विधानाचा आढावा घेताना सांगितले की," सर्व धर्माचे अंतिम तत्व मानवतेचे कल्याण आहे."
वरील वक्त्यांसोबत कय्युम मौलाना, मोहम्मद जावेद शेख, मोहम्मद अस्लम खान हे प्रमुख पाहुणे देखील व्यासपीठावर विराजमान होते. त्यांनी कुरआराना संबंधी मौलिक माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. समीर शेख यांनी नेहमीच्या सफाईने केले. कु.फातिमा शेख हिने 'अल फातिहा'( प्रार्थना) सु रेल आवाजात म्हटली. कु. सानिया शेख हिने प्रार्थनेचा मराठी अनुवाद सादर केला.
उत्सव मूर्ती ए.के.शेख यांनी प्रास्तविकात कुरआन ग्रंथाचा अनुवाद करण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांची माहिती श्रोत्यांना दिली. त्याचेच फलित म्हणजे हा पवित्र ग्रंथ. "माणसाने माणसाशी माणसासम वागणे..." ही प्रसंगानुरूप कविता त्यांनी त्यांच्या सुरेल आवाजात गाऊन दाखवली.
'दिव्य कुरआन' या ग्रंथाचे प्रकाशक 'शब्दान्वय' प्रकाशन संस्थेचे प्रभाकर पवार यांचा सत्कार करण्यात आला. तसेच व्यवस्थापन शास्त्रात पी. एच .डी. मिळाल्याच्या निमित्ताने डॉक्टर समीर शेख यांना सन्मानित करण्यात आले.मुखपृष्ठकार युसुफ सर यांचा देखील सत्कार करण्यात आला.
ज्येष्ठ नागरिक संघाचे आलिशान सभागृह श्रोत्यांनी तुडुंब भरले होते. को.म.सा.प., हास्य क्लब, जेष्ठ नागरिक संघ, जनजागृती ग्राहक मंच, के.गो. लिमये वाचनालय, निवृत्त सेवा संघ, सिटीजन युनिटी फोरम, यासारख्या अनेक सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व सदस्य या प्रसंगी उपस्थित होते.
डॉ. समीर शेख यांच्या आभार प्रदर्शनाने व सामूहिक राष्ट्रगीत गायनाने या कार्यक्रमाची सांगता झाली.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा