*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
देहू ते पंढरपूर संत तुकाराम महाराजांची पालखी इंदापूर अकलूज मार्गे जात असते या पालखी मार्गाचे काम अद्याप पूर्ण झाले नसून देहू ते पंढरपूर या पालखी मार्गावरील पुणे जिल्हा इंदापूर तालुक्यातील सराटी ते सोलापूर जिल्हा माळशिरस तालुक्यातील माळीनगर दरम्यान पालखी मार्ग अंशतः
पूर्ण झालेला आहे अद्याप माळीनगर येथील उड्डाणपूल अर्धवट अवस्थेत आहे मात्र सराटी ते माळीनगर दरम्यानचा पालखी मार्ग मृत्यूचा सापळा बनण्याची शक्यता नाकारता येत नाही? कारण माळीनगर हून सराटी इंदापूर कडे जाणारी वाहने भरघाव वेगाने जातात आणि अकलूज होऊन माळीनगर कडे जाणारी वाहने भरगाव वेगाने धावतात त्यामुळे माळीनगर कडून येणारे वाहन आणि अकलूज कडून माळीनगर कडे जाणाऱ्या वाहनांचे गतिरोधका अभावी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण तेथे छोटसं सर्कल आहे मात्र नवजीवन हॉस्पिटल कडून माळीनगर कडे जाताना पालखी मार्गावर प्रवेश करण्यापूर्वी तेथे डावीकडील बाजूला एक विहीर असून ती विहीर धोकादायक आहे हल्ली साखर कारखान्याचा गळीत हंगाम चालू असून रात्रंदिवस ऊस वाहतूक करणारी वाहने ये जा करत असतात मात्र दिनांक 2 डिसेंबर 2024 रोजी कुर्डूवाडी करमाळा रोडवर ऊस तोडीसाठी येणाऱ्या ट्रॅक्टर असाच रोड शेजारी असलेल्या विहिरीत पडला आणि निष्पाप तीन बालकांचा मृत्यू झाला त्याच प्रमाणे माळीनगर कडे जाणारे आणि माळीनगर कडून येणाऱ्या वाहनांसाठी ही विहीर धोकादायक असून अशाच प्रकारे अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही शिवाय पालखी मार्गावरील संबंधित खात्याने नवजीवन हॉस्पिटल पासून ते पालखी मार्गाला जोडेपर्यंत अद्याप सुरक्षा गार्ड लावले नाहीत त्यामुळे रात्री अपरात्री ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर ला त्या विहिरीमुळे धोका होऊ शकतो तरी पालखी मार्गावरील बांधकाम विभागाने तातडीने तेथे सुरक्षा गार्ड लावण्याची गरज आहे अन्यथा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही 2 नोव्हेंबर रोजी यासंदर्भात बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती मात्र प्रशासनाने त्याची अद्याप दखल न घेता सुरक्षा गार्ड ही लावले नाहीत आणि गतिरोधक ही बसवली नाही त्यामुळे बांधकाम विभाग प्रवाशाचे बळी जाण्याची प्रतीक्षा करत आहे काय ? हे ऊलघडणारे कोडे आहे तसेच पालखी मार्गावर प्रवेश करण्यापूर्वी तेथे गतिरोधकाची आवश्यकता असून गतिरोधक बसवणे अत्यंत गरजेचे आहे तरी पालखी मार्गावरील संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन येथे गतिरोधक आणि संरक्षक गार्ड बसवून होणारी जीवित हानी टाळावी तसेच पालखी मार्गावरून अकलूजहून माळीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवजीवन हॉस्पिटल समोरील चढावर रोडच्या दोन्ही बाजूला अद्याप संरक्षित गार्ड. बसवले नसल्याने एखादा नवीन वाहन चालक या गार्ड अभावी असलेल्या खड्ड्यात जाण्याची दाट शक्यता आहे असे वाहनचालकांमधून बोलले जात आहे!





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा