*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
मंगरूळ ता. तुळजापूर येथील इंदिरा प्रशालेमध्ये नवीन वर्षात प्रशालेला मिळालेल्या यशाचे कौतुक करण्यात आले. त्यामध्य कै. स्वा. से. भानुदासराव जयवंत राव धुरगुडे यांच्या जयंती निमित्त घेण्यात आलेल्या "सामान्य ज्ञान स्पर्धेत" मराठवाडा विभागातून उत्तेजनार्थ पारितोषक मिळाल्या बद्दल प्रशालेचा विद्यार्थी कु -. प्रसाद शिवाजी लबडे याचा सत्कार तसेच त्यांच्या जयंती निमित्त मराठवाडा समन्वय समिती पुणे यांच्या मार्फत शिक्षण क्षेत्रात दिला जाणारा " मराठवाडा भूषण आदर्श शिक्षक पुरस्कार" प्रभाकर मुरलीधर चव्हाण (सर )यांना मिळाला त्याबद्दल त्या दोघांचा सत्कार करण्यात आला..... तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य डॉ. शिंदे सुदर्शन सदाशिव (सर) यांनी जागतिक संस्कृती, पर्यावरण जतन आणि संवर्धन समिती भारत सरकार येथे शिक्षण क्षेत्रातील डॉक्ट्रेट मिळवल्याबद्दल त्यांचा ही सत्कार व सम्मान करण्यात आला याप्रसंगी प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी. शिक्षक जब्बार शेख प्रभाकर चव्हाण मकरंद डोंगरे श्रीमती सुनंदा बचाटे कुसुम तर्फे कल्पना माशाळकर बालाजी डोंगरे बंडू डोंबाळे प्राध्यापक बालाजी गुरव प्राध्यापक अनिल बनसोडे ज्ञानदेव लोहार शिवाजी पारधे विजया जाधव दाजीबा मिसाळ सुभाष बाशेवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा