Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ९ जानेवारी, २०२५

*फिनिक्स इंग्लिश स्कूलमध्ये हस्ताक्षर स्पर्धा घेऊन पहिल्या भारतीय मुस्लिम महिला शिक्षिका -"फातिमाबी शेख" यांना वाहिली आदरांजली!*


 

*अकलूज --प्रतिनिधी*

*केदार---- लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

माळशिरस तालुक्यातील २५/४ लवंग येथील फिनिक्स इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये युगस्त्री फातिमाबी शेख यांच्या जयंती निमित्त शाळेत हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आल्या .शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे या स्पर्धेत सहभाग घेतला .सुंदर अक्षर म्हणजेच सुंदर दागिना असतो ,शैक्षणिक जीवनात व आयुष्यभर वळणदार अक्षर असल्याचे फायदे होतात.त्यासाठी बालवयापासून विद्यार्थ्याना वळणदार सुरेख अक्षर काढण्याची सवय लागली पाहिजे या हेतूने ही स्पर्धा घेण्यात आली .या प्रसंगी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शाळेच्या संस्थापक अध्यक्षा नूरजहाँ शेख म्हणाल्या सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी शिक्षिका फातीमाबी शेख यांनी फुले दाम्पत्या समवेत आपले आयुष्य खर्चीले समाजसुधारन्यासाठी व अक्षरगांगा घरा घरात पोहचवण्यासाठी आयुष्य चंदनापरी झिजविले सावित्री माते समवेत चिखल शेणाचा मारा सहन केला तत्कालीन समजप्रवाहा विरुद्ध चालून अज्ञानाचा काळोख मिटवून अक्षरज्ञानाची ज्योत लावून देशाला प्रकाशमय केले .



         युगसत्री पहिल्या भारतीय मुस्लिम शिक्षिकेच्या जयंती चे औचित्य साधून ही स्पर्धा घेण्यात आली व त्यांच्या या महान कार्याला अक्षर फुले अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.


हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुलशन नशीब शेख व तमन्ना आशिब शेख यांनी प्रयत्न केले .


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा