*अकलूज --प्रतिनिधी*
*केदार---- लोहकरे*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
आज शाळेतील सर्व शिक्षिका व विद्यार्थिनींनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत येवून मुलींनी व महिलांनी आज आपला अभिमानाचा आणि गर्वाचा दिवस असल्याने हा दिवस फुगडी खेळत,सुरेल आवाजात ओव्या गात सावित्रीबाई फुले यांची जयंती लवंग २५/४ (ता.माळशिरस) येथील फिनिक्स इंग्लिशमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून गणेशगांवच्या माजी सरपंच शोभा नलवडे, सामाजिक कार्यकर्त्या अस्मिता कोकाटे,वैशाली जाधव,वैशाली कांबळे उपस्थित होत्या.त्यांच्या शुभहस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व नंतर त्यांच्या कार्याचा आढावा घेणयात आला.चिमुकल्या बलिकांनी सुरेल आवाजात ओव्या गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली.
शाळेच्या संस्थापक अध्यक्षा नूरजहाँ शेख यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय व खडतर जीवनाच्या प्रवासाचा आढावा घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की,जीवनात कितीही संकटे आली तरी न डगमगता प्रत्येकाने संकटाला धीटपणे व धैर्याने सामोरे जायचे हे सवित्रीबाई फुले यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे.त्यांच्यामुळेच आजची स्त्री सुशिक्षित व कर्तृत्ववान झालेली दिसून येत आहे.आज प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत.त्यांनी दिलेल्या शिकवणीच्या मार्गावर आपण चालत आहोत आणि सदैव चालत राहू.अशी ग्वाही दिली.
या प्रसंगी पालक संघाचे अध्यक्ष नीलेश वाघ,उपाध्यक्षा माया कोळी,गुलशन शेख,तमन्ना शेख उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा