Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ४ जानेवारी, २०२५

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाभूळगाव येथे उत्साहात संपन्न


 

*उपसंपादक-- नूरजहाँ शेख*

*टाइम्स 45 न्युज मराठी*

आज दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाबुळगाव केंद्र संगम तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे क्रांतीज्योती, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची  जयंती अतिशय उत्साहात संपन्न झाली. व बालिका दिन व महिला शिक्षण दिन साजरा करण्यात आला.

    सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन गावच्या सरपंच सौ. सारिका सुरवसे मॅडम  ग्रामपंचायत सदस्य सौ. राजनंदिनी पराडे मॅडम व उपस्थित मान्यवर महिलांच्या शुभहस्ते करण्यात आले. यानंतर शाळेतील मुलींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याविषयी मनोगत व्यक्त केले, तसेच उपस्थित माता भगिनींनी अतिशय उत्स्फुर्तपणे सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्या विषयी आपले विचार व्यक्त केले.



    यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने शाळेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बालिका दिन, महिला शिक्षण दिन, महिला मेळावा, हळदीकुंकू कार्यक्रम, महिलांच्या विविध स्पर्धा -  होम मिनिस्टर, संगीत खुर्ची अशा विविध १० प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धा अतिशय आनंदी वातावरणामध्ये संपन्न झाल्या. होम मिनिस्टर व संगीत खुर्ची मधील प्रथम क्रमांक मिळविलेल्या विजयी स्पर्धक महिलांना गावच्या विद्यमान सरपंच सौ. सारिका धनाजी सुरवसे यांचे तर्फे आकर्षक दोन पैठणी साड्या बक्षीस देण्यात आल्या तसेच द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या व उपस्थित सर्व महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.  दुपारच्या सत्रात सर्वांना गोड खाऊ वाटप करण्यात आला.



     सदरील कार्यक्रमासाठी गावच्या विद्यमान सरपंच व या कर्यक्रमाच्या आयोजक सौ. सारिका सुरवसे मॅडम, ग्रामपंचायत सदस्य सौ. राजनंदिनी पराडे मॅडम, तसेच गावातील 80 माता पालक महिलांची उपस्थिती होती.

    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील मुली श्रावणी धनाजी सुरवसे व सृष्टी औदुंबर कुंभार या मुलींनी केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री उघडे सर यांनी केले तर सर्वांचे आभार पाटोळे सर यांनी आपल्या मनोगतामधून मानले.

    हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री तळेकर सर, सौ पूजा कुंभार मॅडम, सौ प्रिया गोदाम मॅडम सौ कांचन साबळे मॅडम व शाळेतील विद्यार्थ्यांनी खूप मोलाचे सहकार्य केले.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा