*उपसंपादक-- नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्युज मराठी
मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड. सोलापूर पंढरपूर विभाग जिल्हाध्यक्ष पदी शिवमती मनोरमा लावंड यांची नियुक्ती करण्यात आली.
या वेळी प्रदेश अध्यक्ष शिवमती शिमाताई बोके व प्रदेश सचिव स्नेहा ताई खेडेकर प्रदेश सदस्य शिवमती सत्यभामा पाटील प्रदेश सदस्य अक्काताई माने व प्रदेश सदस्य प्रियाताई नागणे तसेच ज्येष्ठ मार्गदर्शिका नंदाताई शिंदे मराठा सेवा संघाच्या जिल्हा कार्याध्यक्ष हेमलता मुळीक व सचिव शिवमती वनिता कोरटकर उपस्थित होत्या.
शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांच्या 75व्या वाढदिवस बालगंधर्व रंगमंदिरा मधे खूप मोठ्या उत्सवाने साजरा करण्यात आला यावेळी खेडकर साहेब व शिवमती रेखाताई खेडेकर यांनी जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना मनोरमा लावंड म्हणाल्या की पंढरपूर विभागातील प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये खेडोपाडी जिजाऊ ब्रिगेड ची शाखा काढून खेडेकर साहेबांचे विचारधारा प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करीन असे सांगितलं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा