*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी -टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 8378081147
----- पुणे येथे झालेल्या २० वी महेश्वरानंद सरस्वती मेमोरियल जलदगती बुद्धीबळ स्पर्धेत भाग घेऊन राजकुमार बंडगर व राज दुधाळ यांनी आंतरराष्ट्रीय गुणांकण प्राप्त केले. राजकुमार यास 1625 तर राज दुधाळ यास 1464 रेटींग नवीन वर्षी अधिकृत प्रसिद्ध झाले. एकुण 446 स्पर्धकांनी भाग घेतलेल्या या स्पर्धेत इंटरनेशनल मास्टर व ग्रांडमास्टरचा देखील सहभाग लाभला. बारामती येथील ईमाॅर्टल चेस अकॅडमीचे प्रशिक्षक अमर शिंदे यांचे त्यांना विशेष प्रशिक्षण लाभले. राजकुमार यांस राहुल देवकाते व ज्ञानेश्वर खोडवे सरांकडून वेळोवेळी प्रेरणा व सहकार्य लाभले. यशाबद्दल मंदार देवकाते, सागर निकम, मालोजी माने, चंद्रशेखर झगडे या खेळाडूंनी विशेष कौतुक केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा