*उपसंपादक - नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
महिला आर्थिक विकास महामंडळ सोलापुर अंतर्गत अस्मिता लोकसंचलित साधन केंद्र,महाळुंग अंतर्गत दुर्वा,श्री गणेश,स्वराज्य,विश्वरत्न ग्रामसंस्था व ग्रामपंचायत लवंग. यांच्या संयुक्त विद्यमानाने लवंग येथे संक्रांत निमित्त मिटिंगचे व हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आली.
या कार्यक्रमाला लवंग ग्रामपंचायत सरपंच प्रशांत पाटील यांच्या पत्नी मोहिनी प्रशांत पाटील, ग्रामपंचायत सदस्या मोहिनी कांबळे प्रमुख पाहुणे म्हणून फिनिक्स इंग्लिश मिडीयमच्या संस्थापक व अध्यक्षा नूरजहाँ शेख,श्री गणेश ग्रामसंघच्या अध्यक्षा हर्षदा भिलारे उपअध्यक्षा भिलारे सचिव खजिनदार व दुर्वा ग्राम संघ अध्यक्ष सुवर्णा लोंढे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापनचे सदस्य वाघ मॅडम विश्वरत्न ग्रामसंघचे उपाध्यक्ष अस्मिता कोकटे सीआरपी सारिका गायकवाड,पल्लवी कदम,माण फाऊंडेशनचे बाबर व साबळे मॅडम,लेखापाल अमोल भोसले, लखन साठे तसेच बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी महिलांसाठी संगीत खुर्ची व उखाणा घेण्याच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते तसेच बचत गटातील महिलांना सक्षमीकरणासाठी लघुउद्योग व व्यवसायासाठीचे मार्गदर्शन करण्यात आले.यामध्ये बँक कर्ज बाबत,अर्धलीन शेळी पालन, पिकप रिक्षा बद्दल माहिती,ड्रोन सखी बद्दल माहिती,महिलांना नवीन उद्योग व्यवसाय उभारणी करण्याबाबत प्रोत्साहन देण्यात आले.तसेच पशू हेल्थ विमा, साक्षरता मोहीम बदल माहिती सांगण्यात आली.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुण्या नूरजहाँ शेख म्हणाल्या की,पतीचे निधन झालेल्या महिलांना समाजात सन्मानाची वागणूक देऊन सावित्री मातेच्या स्त्री सन्मानाचा लढा आपल्या आचरणातून आपन आणावा.विधवा महिलांना पदोपदी नकळत चुकीच्या रूढी परंपरामुळे अपमानित व्हावे लागते.समाजात त्यांना मानाचे स्थान मिळाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लालासाहेब गायकवाड यांनी केले तर सुत्रसंचलन अमोल भोसले यांनी केले तर आभार अस्मिता कोकाटे यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा