Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १८ जानेवारी, २०२५

लाखेवाडी येथील जय भवानी गड विकास प्रतिष्ठान येथील तीन दिवसीय 'मल्हार महोत्सव' उत्साहात संपन्न



 

*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी -

टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:--  8378081147

----- लाखेवाडी (ता. इंदापूर) येथील जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल व विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी यांच्यावतीने विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांना वाव मिळावा, ज्ञानाबरोबर सुसंस्कार ही त्यांना मिळावेत, या उद्देशाने आयोजित केलेला तीन दिवसीय 'मल्हार महोत्सव' उत्साहात पार पडला.

     यावेळी राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते नटराज व श्रीकृष्ण मूर्तीचे पूजन करीत कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. यावेळी संस्थेच्या सहसचिव पौर्णिमा खाडे यांनी संस्थेचा वार्षिक अहवाल सादर केला. संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले यांनी मनोगत आणि संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी प्रास्ताविक केले.

      यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णावरील आधारित भक्तिगीते, गवळणी, कोळीगीत पोवाडा, गोंधळी, शेतकरी, देशभक्ती, गीते, योगकला, अत्याधुनिक तंत्रज्ञान, शिवराज्याभिषेक सोहळा, आधुनिक वाद्य संगीत, लोककला पोतराज गीते, मुलगी वाचवा मुलगी शिकवा, महाभारत, गरबा, शिवतांडव अशा विविध प्रकारचे मनमोहक नृत्याविष्कार विद्यार्थ्यांनी आनंदमयी वातावरणात सादर केले.



     याप्रसंगी प्रशालेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा, क्रीडा महोत्सवातील यशस्वी विद्यार्थ्यांचा ही मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला.

       यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे, सिनेअभिनेते धनंजय जामदार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, सहव्यवस्थापक संचालक सिडको महाराष्ट्र राज्याचे दिलीप ढोले, अतिरिक्त आयुक्त नवी मुंबई मनपा सुजाता ढोले, विभागीय नियंत्रक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे सुहास चौरे, सचिव पर्यावरण, वन पोर्ट व कृषी दादरा नगर हवेली व दमन दीव, भारत सरकारचे सागर डोईफोडे, सहाय्यक वनसंरक्षक विक्रांत खाडे, गटविकास अधिकारी सचिन खुडे आदींनी उपस्थिती लावली.



    यावेळी जय भवानीगड विकास प्रतिष्ठानचे मुख्य सल्लागार प्रदीप गुरव, सचिव हर्षवर्धन खाडे, सहसचिव पौर्णिमा खाडे, संस्थेचे विश्वस्त पृथ्वीराज ढोले, ऋषिकेश ढोले, अक्षता ढोले, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार, प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य राजेंद्र सरगर, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. सम्राट खेडकर आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला.



क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांचा जीवनगौरवने सन्मान

 या महोत्सवाच्या सांगता समारंभासाठी क्रीडामंत्री भरणे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. प्रत्येक व्यक्तीने धकाधकीच्या जीवनात ताणतणाव बाजूला ठेवून जीवनाचा आनंद घ्या, हसत खेळत जीवन जगा, जीवन खूप सुंदर आहे, असा सल्ला भरणे यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना दिला.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा