Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १३ जानेवारी, २०२५

*तुळजापूर येथील उप अधीक्षक भूमी कार्यालयातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी संक्रांती. दिवशी साडी चुडे, बांगड्या ,वाण आणू खन देऊन अनोख्या पद्धतीने आंदोलन करणार--गणेश पाटील*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

तुळजापूर प्रतिनिधी :उपाधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय येथील गैरकारभाराचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला असून मुख्यालय सहाय्यक व अधिकारी वर्ग मुख्यालयात न राहता मुख्यालयात राहत असल्याचे दाखवत शासनाचे घर भाडे उचलत असून संबंधित प्रकाराला वरिष्ठांचा अभय असल्यामुळे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती यांच्या वतीने संक्रातीचे अवचित्य साधून दिनांक 14 जानेवारी रोजी साडी,चुडे व बांगड्या वान खन असे देऊन अनोख्या पद्धतीने आगळावेगळे आंदोलन करण्यात असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी दिले आहे .

         उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय तुळजापूर येथील गैरकारभाराबाबत जिल्हा अध्यक्ष गणेश पाटील यांनी 16 डिसेंबर रोजी तुळजापूर येथील उपाधीक्षक कार्यालय येथे मुख्यालयात रहात नसल्याबाबत अधिकाऱ्यांच्या विरोधात ठिय्या आंदोलन केले होते .परंतु पंधरा दिवसाच्या आत चौकशी करून दोषींवर कारवाही करू अशा प्रकारचे पत्र दिल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आली होती .परंतु पंधरा दिवसाचा कालावधी पूर्ण होऊन पण जाणीवपूर्वक वरिष्ठानकडून सदर प्रकाराबाबत अभय देत असल्यामुळे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी दिनांक 9 जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन भ्रष्ट कारभाराबाबत पत्रकारांसमोर पुराव्यासोबत पुरावे देण्यात आले होते .व दोन जानेवारी रोजी जिल्हाअधिकारी व उपाधीक्षक भूमि अभिलेख तसेच पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनामध्ये दिनांक 14 जानेवारी रोजी साडी,चुडे व बांगड्या वान खन असे देऊन अनोख्या पद्धतीने आगळावेगळे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्या निवेदनात नमूद करण्यात आले होते .




...............चौकट................

             मुख्यालयात न राहता घर भाडं उचलत असल्याबाबत साडी,चुडे व बांगड्या वान खन असे देऊन अनोख्या पद्धतीने आगळावेगळे आंदोलन असल्यामुळे मुख्यालय सहाय्यक हे आंदोलनाचा धसका घेत दोन दिवस रजेवर असल्याचे माहिती मिळत असून आंदोलनामुळे रजा घेतली का काय असा प्रश्न निर्माण झाला आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा