Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १३ जानेवारी, २०२५

*सेवानिवृत्त शिक्षकांचे सर्व प्रश्न लवकरच सोडवू--मुख्य कार्यकारी अधिकारी ,कुलदीप जंगम*

 


*अकलूज --प्रतिनिधी*

*केदार---- लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी यांचे सर्व प्रश्न प्राधान्याने लवकरच सोडवले जातील.असे आश्वासन सोलापूर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सेवानिवृत्त शिक्षक संघटनेने आयोजित केलेल्या बैठकीत दिले. 



        जिल्हाध्यक्ष राजाराम चव्हाण यांनी सेवानिवृत्त शिक्षकांचे अनेक प्रलंबित प्रश्न मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले.त्यामध्ये एम.एस.सी.आय.टी.वसुली सन २०२३-२४ मध्ये सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांच्या थकीत रकमा प्रफंड गट विमा आदर्श शिक्षक पुरस्कार वेतन वाढ पेन्शन विक्री रकमा आदी विषयावर सकारात्मक चर्चा झाली.या बैठकीनंतर सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सर्व सेवानिवृत्त शिक्षकांची एक बैठक घेऊन या बैठकीमध्ये थकित रकमेसाठी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेण्याचे ठरले.नुकतेच राज्य उपाध्यक्ष म्हणून लिंबराज जाधव यांची व जिल्हा उपाध्यक्ष म्हणून श्रीमंतराव गुंड यांची निवड झाल्याने त्यांचा सन्मान संघटनेच्या वतीने अध्यक्ष राजाराम चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी सरचिटणीस अशोक भांजे कोषाध्यक्ष दत्तात्रेय पवार उपाध्यक्ष राज पाटील,उत्तरचे अध्यक्ष भालेराव,अक्कलकोट अध्यक्ष तेलुणगी,मंगळवेढा अध्यक्ष भारत हेंबाडे आदी शिक्षक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा