*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
सुनावणी होण्याआधीच फेरफार मंजूर केल्याबद्दल तक्रार प्रशांत प्रकाश मस्के रा. तुळजापूर यांनी ॲड. शिरीष पुरुषोत्तम कुलकर्णी मार्फत धाराशिव चे जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली असून याबाबत सविस्तर माहिती अशी
प्रॉपर तुळजापूर येथील सर्वे नं. २००/२ ही आक्षेप अर्जदाराची वडिलोपार्जित मिळकत (प्रॉपर्टी) आहे, त्यामध्ये त्याचा हक्क व अधिकार डावलला गेलेला आहे, त्याचेवर अन्याय झालेला आहे, त्यामुळे फेरफार क्र. १६७४७ यास आक्षेपदाराने आक्षेप घेतलेला होता. प्रकरणात मंडळ अधिकारी व तलाठी यांनी आक्षेपदारास सुनावणीची नोटीस दिनांक १६/२/२०२५ ला काढलेली होती, ती आक्षेपदाराने दि. १८/२/२०२५ रोजी ठिक ११.१५ वाजता घेतलेली आहे, प्रकरणात दि. २०/२/२०२५ ही तारीख नेमलेली होती. त्यानंतर दि. ५/३/२०२५ ही तारीख नेमली होती, त्या तारखेस आक्षेपदार हजर राहून रोजनाम्यावर सही केलेली आहे व त्यानंतर दि. ११/३/२०२५ ही तारीख नेमलेली होती, आक्षेपदार दि. ११/०३/२०२५ रोजी हजर राहून तारखेबाबत विचारणा केली असता मंडळ अधिकारी तुळजापूर व तलाठी तुळजापूर प्रॉपर यांनी सदर प्रकरणाबद्दल उडवाउडवीची उत्तरे दिली व प्रकरणाची संचिका ही दाखविण्यात आली नाही, आक्षेपदारास संशय आल्यामुळे आक्षेपदाराने ऑनलाईन बघितले असता फेर फार हा दि. २३/१/२०२५ रोजीच १६७४७ या क्रमांकानुसार मंजूर झालेला आहे, प्रकरणात नोटीस देऊन आक्षेपदाराचे म्हणणे घेणे व नंतर निर्णय देणे हे कायदेशीर बंधनकारक आहे, परंतू तसे न करता सुनावणी न घेता आक्षेप अर्जदाराचे म्हणणे न घेता त्यांना सुनावणीची संधी न देता आधीच फेरफार मंजूर करण्यात आलेला आहे प्रशांत प्रकाश मस्के यांनी अर्जासोबत पूर्ण कागदपत्रे जिल्हाधिकारी यांना दिले आहे तरी जिल्हाधिकारी यांनी सदर महसूल अधिकारी (मंडल अधिकारी व तलाठी) यांची तात्काळ चौकशी करून योग्य ते शासन करावे ही आपणास नम्र विनंती करत असून अशा पद्धतीचे कार्य करणारे मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यामुळे पूर्ण महसूल विभागाची बदनामी होत आहे व सर्वसामान्य जनतेवर अन्याय होत आहे तरी जोशीवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशीही निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे
*माहितीस्तव आणि कार्यवाहीस्तव प्रत सविनय सादर*
१) देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई
२) चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई
यांना सादर करण्यात आले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा