Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १३ मार्च, २०२५

*धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नळदुर्ग येथील भुईकोट किल्ला येथे ध्वज स्तंभ उभारणीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा --परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मागणी*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

छत्रपती शिवाजी महाराज चौक हा धाराशिव शहराच्या मध्यवर्ती भागात असून हा चौक रहदारीने कायम गजबजलेला असतो. सदर चौक हा धाराशिव शहरातील मुख्य आकर्षण आहे, या चौकामध्ये ध्वजस्तंभ उभारल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडण्यास मदत होणार आहे. तसेच नळदुर्ग भुईकोट किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील धाराशिव जिल्ह्यामधील एक किल्ला आहे. नळदुर्ग किल्ला एक प्रसिद्ध प्राचीन किल्ला असुन नळदुर्ग हा महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यातील सर्वांत मोठा किल्ला आहे. सदर किल्ला हा धाराशिव जिल्ह्यातील मुख्य आकर्षण आहे, या किल्ल्यामध्ये ध्वजस्तंभ उभारल्यास किल्ल्याच्या सौंदर्यात भर पडण्यास मदत होणार आहे.


तरी, जिल्हा वार्षिक योजना अनुसूचित जाती घटक कार्यक्रम सन २०२४-२५ अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून छत्रपती शिवाजी महाराज चौक, धाराशिव, जि.धाराशिव येथे ध्वजस्तंभउभारणेसाठी रू.९१.०० लक्ष तसेच तसेच नळदुर्ग भुईकोट किल्ला, ता. तुळजापूर, जि.धाराशिव येथे ध्वजस्तंभ उभारणेसाठी रू.९७.०० इतका निधी उपलब्ध करून देण्यात यावा.



(प्रताप सरनाईक)


प्रति,


जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव,


जिल्हा नियोजन समिती, धाराशिव.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा