Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १४ मार्च, २०२५

*नैसर्गिक रंगांचा वापर करण्याचे आवाहन –क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे*

 


*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी -टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 8378081147

-----आज धुलीवंदन निमित्त तळजाई टेकडी येथे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार भीमराव तापकीर यांनी सहकाऱ्यांसह रंगांच्या सणाचा आनंद घेतला. यावेळी खेळताना उपस्थितांनी कोरड्या रंगांचा वापर करण्याचे आणि पाण्याचा अपव्यय टाळण्याचे महत्त्व सांगितले. तसेच, नैसर्गिक रंगांचा वापर करण्याचे आवाहन मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.




यावेळी उपस्थित सर्वांनी एकत्र येऊन धुळवड खेळला आणि या सणाच्या आनंदात रंगबेरंगी वातावरण निर्माण केले. ‘आनंदाने होळी खेळा, पण पर्यावरणाचा विचार करा’ असे आवाहन करत सर्वांना धुलीवंदनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.


याप्रसंगी स्थानिक सहकार्याच्या मदतीने एकत्रित येत सण साजरा करण्यात आले होते, आणि सणाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाची महत्त्वाची भूमिका ठरली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा