Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १५ मार्च, २०२५

*"रोजा "-मुळे माणूस चांगला आणि चांगला मनाचा बनतो--खासदार-धैर्यशील मोहिते पाटील*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्ट्या रोजा मुळे मन शुद्धी होते आणि कृती चांगली राहते ,रोजाचा महिना "रमजान" हा केवळ उपासनेचा महिना नाही तर तो माणसाला चांगल्या मनाचा आणि चांगला माणूस बनवण्याचा पवित्र महिना आहे असे प्रतिपादन माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी संग्राम नगर येथील आयोजित अल् फत्हा मस्जिद येथे इफ्तार पार्टीच्या प्रसंगी व्यक्त केले 

  याप्रसंगी खासदार धैर्यशील मोहिते पाटील व सयाजी राजे मोहिते पाटील या प्रमुख पाहुण्यांचे हस्ते रोजेदारांना खजूर व फळाचे वाटप करण्यात आले 




   हाजी आदम भाई तांबोळी यांच्या हस्ते खासदार- धैर्यशील मोहिते पाटील यांचा तर हमीद भाई मुलाणी यांच्या हस्ते सयाजीराजे मोहिते पाटील यांचा सत्कार करण्यात आला 

    अल् फत्हा मस्जिद च्या अध्यक्षपदी हमीदभाई मुलांणी यांची निवड झाल्याबद्दल खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला तर उपाध्यक्षपदी लखन भाई तांबोळी यांची निवड झाल्याबद्दल सयाजीराजे माहिते पाटील यांच्या हस्ते दोघांचा सत्कार करण्यात आला 

     याप्रसंगी अल् फत्हा मस्जिद चे कमिटीचे सर्व सदस्य तसेच जय संग्राम गृह संकुल /अल् फत्हा मस्जिद तांबोळी वसाहत संग्राम नगर येथील हिंदू मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते 

     या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अतिकभाई शेख यांनी केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा