Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १२ मार्च, २०२५

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या इंदापूर तालुका समूह संघटक राणी भगत (वणवे) यांचे अल्पशा आजाराने आकस्मित निधन, आशासेविकांचा आधार हरपला


*कार्यकारी संपादक - एस. बी. तांबोळी -टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 8378081147

 येथील राणी सुधाकर भगत (वणवे) यांचे अल्पशा आजाराने आकस्मित निधन

----- राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या इंदापूर तालुका समूह संघटक (BCM) व आगलावे वस्ती (बावडा) येथील राणी सुधाकर भगत (वणवे) यांचे अल्पशा आजाराने आकस्मित निधन झाले. निधना समयी त्यांचे वय ३५ वर्षाचे होते. त्या़ंच्या पश्चात पती, दोन मुली असा परिवार आहे.

    प्रशासनामध्ये राणी भगत (वणवेंचे) काम उत्कृष्ट प्रशासक व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून सर्वपरिचित होत्या. इंदापूर तालुक्यातील आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांच्यामध्ये त्यांचा आदरयुक्त दरारा होता. पुणे जिल्ह्यातील समूह संघटक, सर्व तालुका समूह संघटक, गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका यांचा आधारस्तंभ काळाच्या पडद्याआड कायमचा गेला आहे.

   राणी भगत (वणवे) मॅडम यांच्या दुःखद निधनाची बातमी समजताच इंदापूर तालुक्यातील सर्व गट प्रवर्तक व आशा स्वयंसेविका यांनी कामकाज बंद ठेऊन एक दिवसाचा दुखवटा पाळला. तर त्यांच्या अंतविधीला इंदापूर व बारामती तालुक्यातील गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका़ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

फोटो - राणी सुधाकर भगत (वणवे) 

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा