Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १३ मार्च, २०२५

*तोंडले ता. माळशिरस येथे "जागतिक महिला दिन" व महिला आर्थिक विकास महामंडळ सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन साजरा*

 


*अकलूज --प्रतिनिधी*

*केदार---- लोहकरे*

*टाइम्स 45 न्यूज मराठी


महिला आर्थिक विकास महामंडळ सोलापूर,जिल्हा समन्वयक सोमनाथ लामगुंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली उमंग लोकसंचलित साधन केंद्र, बोरगाव व ज्ञानेश्वरी ग्रामसंस्था तोंडले यांच्या वतीने तोंडले (ता.माळशिरस) येथे जागतिक महिला दिन व महिला आर्थिक विकास महामंडळ सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून तोंडले गावचे सरपंच भिकाजी लोंढे सरपंच,उपसरपंच शरद चव्हाण, ग्रामविकास अधिकारी श्री किर्दक भाऊसाहेब,माजी सरपंच रघुनाथ नारायण चव्हाण, माळशिरस तालुका जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा शिवमती शारदा चव्हाण,सौ.सुनिता काटकर, सौ.मधुरा चव्हाण यांची उपस्थिती होती.

            या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व्यवस्थापक शिवाजी शेंडगे सर यांनी केले यावेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.सत्कारमूर्तीमध्ये सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या माळशिरस तालुका जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा शिवमती शारदा चव्हाण, शिवमती रंजना शिरसट,शिवमती मनीषा भालके,जिल्हा परिषद शिक्षिका गमे-ढोले मॅडम,प्रिया महामुनी मॅडम,स्वातंत्र्य सैनिक शहीद पत्नी विद्या पवार व पोपाबाई भोरे ग्रामपंचायत सदस्य दिपाली साठे व आशा क्षीरसागर यांचा सन्मान करण्यात आला.तसेच वैशाली बिले सचिव उमंग लोकसंचलित साधन केंद्र,विजया गायकवाड अध्यक्षा माळेवाडी-बोरगाव ग्रामसंघ,शुभांगी सावंत कार्यकारणी दसुर ग्रामसंघ, सुवर्णा साठे अहिल्या ग्रामसंस्थेच्या कार्यकारणी, हसीना शेख नवशक्ती ग्रामसंघाच्या सचिव,लेखापाल शैलजा पोतदार,ग्रामसंघ लेखापाल अर्चना शेळके, सीआरपी शोभा जाधव यांचा सन्मान करणार आला. 

         यावेळी सत्कारमूर्ती व बचत गटातील महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले.सत्काराच्या कार्यक्रमानंतर विविध कलागुणांना वाव देण्यासाठी महिलांचे खेळ घेण्यात आले. यावेळी ज्ञानेश्वरी ग्राम संघाच्या कार्यकारणी,सर्व सीआरपी, सहयोगिनी तसेच तोंडले गावांमधील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.    



        या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एल.डी.सी.राम सर यांनी केले,आभार मधुरा चव्हाण यांनी मानले.अल्पोपहराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा