Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ४ एप्रिल, २०२५

*'कल्पना लक्ष्मणराव जाधव'- यांची "तेजस्विनी महाराष्ट्राची पुरस्कार 2025 "साठी निवड*

 


*विशेष---प्रतिनिधी*

  *राज(कासिम) -मुलाणी* 

 *टाइम्स 45 न्यूज मराठी


बारामती येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ कल्पना लक्ष्मणराव जाधव यांना छत्रपती शिवाजी नगर- मलकापूर ,जि. बुलढाणा येथील माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशन महाराष्ट्र राज्य चा "तेजस्विनी महाराष्ट्राची "पुरस्कार-2025 या पुरस्कार सोहळ्या साठी आपली निवड करण्यात आली असल्याची माहिती माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष विवेक सुभाष राजापुरे यांनी पत्राद्वारे कळविले आहे

     या पुरस्कारा बाबत निवड झाली त्या प्रसंगी" टाइम्स 45 न्यूज मराठी"शी बोलताना कल्पना जाधव म्हणाल्या की माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण तो आहे की सन 1999 साली शिखर शिंगणापूर जि. सातारा येथे एस पी ओ म्हणून शंभू महादेवाच्या भाविकांची सेवा करण्याची पहिली संधी मला प्राप्त झाली तेव्हापासून मी सामाजिक क्षेत्र काम पाहत आहे आणि कौतुकाची थाप म्हणून माझा प्रथमच कै.आमदार सदाशिवराव पोळ आणि साताऱ्याचे पोलीस अधीक्षक एम के राठोड यांनी सन्मान केला तो माझा जीवनातील आनंदाचा क्षण आहे असे त्या म्हणाल्या.

     बारामती येथील सामाजिक कार्यकर्त्या संकल्पना लक्ष्मणराव जाधव आणि समाजसेवा ही समीकरण एकदम घट्ट झाले असून त्यांना यापूर्वी कोविड योद्धा, जिजाऊ रत्न ,सामाजिक रत्न, महिला दिनाचा आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक आदर्श असे शेकडो पुरस्कार प्राप्त झाले असून त्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी अग्रेसर असतात त्यांच्या या कार्याची दखल घेऊन माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशनने तेजस्विनी महाराष्ट्राची पुरस्कार 2025 जाहीर करून निवड करण्यात आली आहे


तेजस्विनी महाराष्ट्राची पुरस्कार-2025 या पुरस्काराचे वितरण शनिवार 26 एप्रिल 2025 दुपारी 12 वा. स्थळ : तालुका शिक्षक संघ पतसंस्था हॉल, ४० बिघा मलकापूर जि. बुलडाणा येथे प्रमुख अतिथी व इतर मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याची माहिती माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष विवेक सुभाष राजापुरे यांनी कळविले आहे

   

  *सौ.कल्पना लक्ष्मणराव जाधव- यांना माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचा "तेजस्विनी महाराष्ट्राची पुरस्कार 2025 "पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल "टाइम्स 45 न्यूज मराठी अकलुज आणि समूहाच्या वतीने 'हार्दिक हार्दिक अभिनंदन'*




 *निमंत्रक*

* *विवेक सुभाष राजापुरे*

*संस्थापक अध्यक्ष--*

*माणुसकी मल्टीपर्पज फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा