Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ४ एप्रिल, २०२५

*कोंडबावी ता. माळशिरस येथील जि. प. प्राथमिक शाळेत तहसील कार्यालय माळशिरस च्या वतीने विविध दाखले चे शिबिर संपन्न*

 


*यशवंतनगर--प्रतिनिधी*

*रियाजभाई तांबोळी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी

कोंडबावी येथे जि प प्राथमिक शाळा येथे तहसील कार्यालय माळशिरस च्या वतीने 4 एप्रिल 2025 रोजी विद्यार्थ्यांसाठी विविध दाखल्याची शिबिर संपन्न झाले            



            . सदर शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना आगामी सन 2025 26 शालेय ऍडमिशन साठी लागणारे विविध दाखल्यापैकी उत्पन्नाचा दाखला, डोमासाईल दाखला, जातीचा दाखला व नॉन क्रिमिलीयर दाखले देण्यासाठी एक दिवसीय शिबिराचे आयोजन केले होते. सदर शिबिर यशस्वी होण्यासाठी माळशिरस उपविभागीय अधिकारी पांगरकर मॅडम यांचे संकल्पनेतून व माळशिरस तहसीलदार शेजुळ रावसाहेब यांचे मार्गदर्शनाखाली व अकलूज मंडळ चे मंडल अधिकारी लकडे मॅडम यांचे नियोजनाखाली ग्राम महसूल अधिकारी अजित पिंगळे, अकलूजचे ग्राम महसूल अधिकारी शिंदे साहेब, धनवडे भाऊसाहेब, भानवसे भाऊसाहेब, विक्रम शिंदे भाऊसाहेब तसेच कोंडबावी गावचे ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व अधिकारी वर्ग, महा-ई-सेवा संघातील धारक, यांचे परिश्रमाने सदर शिबिर यशस्वीरित्या पार पडले. सदर शिबिरात १६५ दाखले संकलित करण्यात आले. या शिबिरात पंधरा उत्पन्नाचे दाखले जागेवर वितरीत करण्यात आले यामुळे चालू शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना ऍडमिशन साठी विविध दाखले उपलब्ध करून देण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा