*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी, मोबाईल नंबर 8378081147
: -----शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भाग्यश्री हर्षवर्धन पाटील यांची संचालक मंडळाच्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी दादासाहेब उत्तम घोगरे यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.
नीरा भीमा कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच कारखान्याचे संस्थापक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली. संचालक मंडळाची बैठक उपजिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांढरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी अध्यक्षपदासाठी भाग्यश्री पाटील व उपाध्यक्षपदासाठी दादासाहेब घोगरे या दोघांचेच अर्ज आल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांढरे यांनी केली. निवडीनंतर कारखान्याचे संस्थापक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये नूतन अध्यक्षा भाग्यश्री पाटील व उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कारखान्याचे संस्थापक संचालक हर्षवर्धन पाटील, लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, अँड. कृष्णाजी यादव, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगिता पोळ, कल्पना शिंदे हे संचालक उपस्थित होते. कार्यकारी संचालक एन. ए. सपकाळ यांनी आभार मानले.
नीरा भीमा कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील म्हणाले की, जी व्यक्ती कारखान्याचे रोपटे लावते, वाढविते व मोठे करताना किती त्रास व अडचणी असतात हे रोपटे लावणाऱ्यास माहिती असते. नीरा भीमाच्या सन 1998 च्या स्थापनेपासून गेली 26 वर्षे कारखान्यावरती शेतकरी सभासदांचा मोठा विश्वास कायम आहे. या विश्वासाच्या शिदोरीवरच कारखान्याने आज पर्यंतच्या प्रगतीचा मोठा टप्पा गाठलेला आहे.
मागील हंगामातील उर्वरित शेतकऱ्यांचे पेमेंट येत्या काही दिवसात अदा केले जाईल. कारखान्याचा समावेश आगामी काळात राज्यातील नामांकित कारखान्यांमध्ये होईल, असे आपले ध्येय आहे. कारखान्याचा आगामी गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने यशस्वी होईल, त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा