Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २९ एप्रिल, २०२५

*पहेलगाम येथे 26 निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या दहशतवादाचा बिमोड करा-- अकलूज शहर मुस्लिम समाजाची मागणी*

 


*अकलूज.-- प्रतिनिधी*

*शकूरभाई --तांबोळी*

 *टाइम्स 45 न्युज मराठी

निष्पाप बळी घेणारे दहशतवाद्‌यांविरुद्ध कठोर पावले उचलून त्यांचा बिमोड करावा अशी मागणी निवेदनाद्वारे अकलूज शहर मुस्लिम समाजाच्या वतीने अकलूज उपविभागीय अधिकारी अकलूज यांच्या कडे केली आहे


जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ला हा हिंदु-मुस्लिम बांधवावर झालेला हल्ला नसून मानवेतवर झालेला हा भ्याड हल्ला आहे अशा क्रूर हल्ल्याचा समस्त मुस्लिम समाज सर्वत्र तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहे.


देशाचे सार्वभौमत्व, एकता व अखंडतेला तडा देण्याचा हा केविलवाना नापाक प्रयत्न दहशतवा‌द्यांकडून सुरु आहे. मात्र देशातील आम्ही सर्वच भारतीय अशां दहशतवादी कृत्याला जशास तसे उत्तर देण्याचे बलाढ्य सामर्थ्य ठेवली. या दहशतवादी विरुद्ध लढाईत भारत सरकारच्या प्रत्येक कठोर कारवाई करण्याच्या भूमिकेबरोबर आम्ही मुस्लिम बांधव सहभागी आहोत. या हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व भारतीयांना अकलूज शहर व माळशिरस तालुका मुस्लिम समाज बांधवांकडून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करतो.




माहितीसाठी प्रत रवाना:


१) मा. महामहिम राष्ट्रपती, भारत सरकार

२) मा. प्रधानमंत्री, भारत सरकार

३) मा. गृहमंत्री, भारत सरकार

महसूल सहाय्यक

विभागीय अधिकारी कार्यालथ उपविभागीय अधिकारी अकलूज

यांना देण्यात आले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा