*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी मोबाईल नंबर 8378081147
-----पिंपरी बुद्रुक केंद्रातील सुग्रीव तुकाराम मिटकल व दत्तात्रय सदाशिव चव्हाण या प्राथमिक शिक्षकांचा सेवानिवृत्ती निमित्त सेवापूर्ती समारंभ तिर्थक्षेत्र नीरा नरसिंहपूर येथे उत्साहात संपन्न झाला. गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तर श्री संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज बापूसाहेब मोरे महाराज कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.
शिक्षण क्षेत्रामध्ये सुमारे ३५ वर्ष विना अर्जित रजा अखंड सेवा केल्यानंतर सुग्रीव तुकाराम मिटकल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाणवस्ती येथून तर ३२ वर्ष अखंड सेवा करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लुमेवाडी येथील मुख्याध्यापक दत्तात्रय सदाशिव चव्हाण हे दोघेही ३१ मे २०२५ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा सेवापूर्ती समारंभ पिंपरी बुद्रुक केंद्रातील शिक्षकांच्या वतीने नरसिंहपूर येथे आयोजित करण्यात आला होता. दोघांनाही सन्मानपत्र देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी वारकरी संप्रदायातील अनेक वारकरी मंडळी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पिंपरी बुद्रुक केंद्रातील सर्व शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर त्याचबरोबर शिक्षक संघटनांचे पदाधिकारी शिक्षक सोसायटीचे संचालक मंडळ, पिंपरी केंद्रातील सर्व शिक्षक तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक विजय पाटील सर यांनी केले तर आभार प्रदर्शन युवा नेते सचिन पराडे पाटील यांनी केले.
फोटो -नीरा नरसिंहपूर येथे पिंपरी बुद्रुक केंद्रातील सुग्रीव मिटकल व दत्तात्रय चव्हाण यांचा सेवानिवृत्ती निमित्त सेवापूर्ती समारंभ.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा