*संपादक -- हुसेन मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
डॉ. दा. भ. मार्ग पोलीस ठाणे, मुंबई येथे कार्यरत असलेले *पोलीस उपनिरीक्षक -अजीम* *खाजालाल शेख*
यांनी डॉ. दा. भ.मार्ग पोलीस ठाणे, मुंबई गु.र.क्र. २४/१९९३ कलम १४३, १४४, १४५, १४७, १४८, १४९, ४२७, ४३६, ४५७, ३८० भादंवि या गुन्ह्यातील ३२ वर्षांपासून फरारी असलेल्या आरोपीताचा शोध घेऊन त्यास अटक करुन मोलाची कामगिरी केलेली आहे. त्यांनी केलेल्या सदरच्या प्रशंसनिय कामगिरी बाबत त्यांना पोलीस सह आयुक्त(कायदा व सुव्यवस्था) बृहन्मुंबई यांच्या कडून शाब्बासकीची थाप म्हणून "पोलीस उपनिरीक्षक--- अजीम शेख यांना नुकतेच प्रशंसापत्र प्रदान करण्यात आले असून
आपण भविष्यात देखील अशाच प्रकारे उत्तम कामगिरी बजावत रहाल असा दृढ विश्वास पोलीस सह आयुक्त "श्री सत्य नारायण" यांनी व्यक्त केला आहे.
त्यांच्या या कामगिरी बाबत सर्वच स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे
पोलीस उपनिरीक्षक अजीम खाजालाल शेख यांच्या या कामगिरी बाबत "टाइम्स 45 न्यूज मराठी चे संपादक --हुसेन मुलाणी"यांच्यावतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा