Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २ एप्रिल, २०२५

*वन परिमंडळ अधिकारी संजय लडकत यांचे कार्य प्रेरणादायी--- वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र आटोळे* *लडकत यांच्या सेवानिवृत्ती च्या निमित्ताने गौरवोद्गार*

 


*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-- 9730 867 448

वन परिमंडळ अधिकारी संजय लडकत यांनी वनविभागात ३२ वर्षे केलेले काम इतरांना प्रेरणादायी असून त्यांनी आपली बत्तीस वर्षाची बजावून एक कार्य तत्पर अधिकारी कसा असतो हे दाखवून दिले असल्याचे प्रतिपादन माळशिरस वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र आटोळे यांनी वन परिमंडळ अधिकारी संजय लडकत यांच्या सेवा निवृत्ती निमित्त आयोजित केलेल्या सत्कार समारंभात बोलताना केले. यावेळी संजय लडकत यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. यावेळी वन विभागातील डी.एन. सावंत, ई.एस. लोखंडे, बी.वी. तांबे, पी.बी. कोंबडे, टी.एस. दिघे, एस.वी. गिते, डी. एस. देवकर, डी.एस. चंदनशिवे, जे.एन. जगदाळे, डी.एस. देवकर, एन.एन. गुंड, सतीश घाडगे, विजय काळे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सन १९९४ मध्ये वन विभागात रुजू झालेल्या वडकत यांनी माळशिरस, सोलापूर, सांगोला, पुणे याठिकाणी सेवा बजावली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा