*विशेष---प्रतिनिधी*
*राज(कासिम) -मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
पुरंदावडे गावचे सुपुत्र शशिकांत पुरुषोत्तम कुलकर्णी. यांना मथुरा (उत्तर प्रदेश) येथील दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठाकडून पीएचडी पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली.
अयोध्या येथे झालेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी झाशीच्या राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यालयाचे पूर्व कुलपती डॉक्टर .अरविंद कुमार होते.
अध्यक्षस्थानी दीनदयाल उपाध्याय विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर इंद्र भूषण मिश्रा होते. मिश्रा यांच्या हस्ते कुलकर्णी यांना पदवी प्रदान करण्यात आली यावेळी मथुरा येथील सुप्रसिद्ध कथा वाचिका दीपा मिश्रा राष्ट्रीय पर्यावरण तज्ञ डॉक्टर विश्वनाथ पाणीग्रही यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कुलकर्णी हे 35 वर्षापासून अकलूजच्या शिवरत्न शिक्षण संस्थेच्या शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज धवलनगर यशवंत नगर येथे हिंदी विषयाचे शिक्षक म्हणून काम करत आहेत त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन हिंदी शिक्षक संघ सोलापूर यांचा हिंदी आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे हिंदीमध्ये लिखाण करून हिंदीचा प्रचार प्रसार केला आहे हिंदी तज्ञ शिक्षक म्हणून शिक्षकांना व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले आहे अनेक विद्यालयांमध्ये व्याख्याने दिली आहेत दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे यापूर्वी त्यांना आदर्श हिंदी शिक्षक तसेच रोटरी क्लब चा राष्ट्र निर्माण पुरस्कार मिळाला आहे.
त्यांच्या यशाबद्दल शिवरत्न शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष - खासदार धैर्यशिल मोहिते पाटील अध्यक्षा शितलदेवी मोहिते पाटील अर्जुनसिंह मोहिते पाटील कीर्ती ध्वजसिंह मोहिते पाटील शिवतेजसिंह मोहिते पाटील व जिल्ह्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा