*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
धाराशिव चे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी नुकतीच तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयास भेट देऊन रुग्णालयातील वैद्यकीय सेवा, सुविधा व स्वच्छतेची पाहणी करून रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले
विशेष उल्लेख करावासा वाटतो, की MD मेडिसिन असलेल्या डॉ. (श्रीमती) अंजली गाटे या अत्यंत अल्प पगारात देखील दर्जेदार आणि समर्पित सेवा देत आहेत. त्यांच्या या सेवाभावी कार्याचे मनापासून कौतुक केले. तसेच कोविड सेंटरच्या कालावधीमध्ये डॉक्टर गडेकर यांनी अतिशय प्रामाणिकपणे काम केल्याबद्दल व अनमोल सहकार्य केल्याबद्दल त्यांचे सत्कार करण्यात आला
रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या डायलेसिस सेंटर व ब्लड स्टोरेज युनिटचा आढावा घेतला. रक्त संक्रमणाचा धोका टाळण्यासाठी NAT टेस्टिंग करून रुग्णांना रक्तपुरवठा करण्याचा उपक्रम उल्लेखनीय आहे.
प्रत्येक रुग्णाशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. रुग्णालयातील स्वच्छता व सर्वसामान्यांना मिळणाऱ्या सुविधा समाधानकारक असून, लवकरात लवकर उपचार मिळावेत यासाठी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. चोरमले व त्यांची संपूर्ण टीम सतत प्रयत्नशील आहे.
याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर चोरमले , डॉक्टर अंजली गाटे डॉक्टर गडेकर यांचा सन्मान करण्यात आला
त्यांच्या या कार्यासाठी डॉ. चोरमले व सर्व सहकारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा! त्यावेळेस शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख शामलताई पवार .माजी नगरसेवक राहुल कपले .नवनाथ जगताप .अनमोल साळुंखे .अर्जुन आप्पा साळुंखे .श्याम पवार .सागर इंगळे .चेतन बडगर. दिनेश रसाळ. बापूसाहेब नाईकवाडी. प्रेम कदम. इत्यादी उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा