*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
सवतगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथील दयानंद रामदास जाधव यांच्या घरी दिवसाढवळ्या ११ ते१२/४५ वाजण्याच्या दरम्यान ३३९,०००/-रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने चोरी गेली असल्याची फिर्याद अकलूज पोलीस ठाण्यात दाखल झाले असून त्याबाबत फिर्यादीने दिलेला जवाब पुढीलप्रमाणे
फिर्यादी जबाब ता. 05/05/2025
मी दयानंद रामदास जाधव, वय 39वर्ष, धंदा नोकरी, रा-सवतगाव ता. माळशिरस, जि. सोलापुर मो.नं-
9657526026 समक्ष हजर राहून फिर्यादी जबाब देतो की, मी वरील ठिकाणी
माझी पत्नी माधुरी व मुलासह राहणेस असुन मी RBL बैंक शाखा अकलुज येथे असिस्टंट मॅनेजर या पदावर नोकरी करित असुन त्यावर कुटुंबाची उपजिवीका भागवितो. आज दिनांक 05/05/2025 रोजी सकाळी 10/00या मी नेहमीप्रमाणे बँकेत कामावर हजर होऊन काम करित असताना माझी पत्नी माधुरी ही मुलास सोबत घेऊन आमचे सवतगाव ता माळशिरस येथील राहते घरास कड़ी कोयंडा कुलुप लावुन सकाळी 11/00वा चे सुमारास माझा जेवणाचा डबा घेऊन अकलुज येथील बँकेत आली
होती. ती माझेजवळच असताना आमचे घराचे शेजारी राहणारी मोनाली महेश कदम हिने माझे पत्नीचे मोबाईलवर
11/45 वा फोन करुन तुमचे घराचा दरवाजा उघडून कोणीतरी आत जावून काहीतरी घेवुन दोन मुले मोटारसायकलवरुन निघुन गेली आहेत, असे कळविल्याने मी व माझी पत्नी लागलीच आमचे घरी आलो असता माझे
घराचा कडीकोयंडा तोडुन कोणीतरी आतमध्ये प्रवेश केल्याचे लक्षात आले. त्यानंतर आम्ही घरातील लोखंडी कपाट उघडून पाहिले असता त्यातील कपडे व इतर वस्तू अष्टव्यस्त पडलेल्या दिसल्या त्यानंतर आम्ही कपाटातील ड्राव्हर उघडून पाहिले असता त्या ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने वर्णन खाली प्रमाणे
१)१,६०,०००/रु, किमतीचे गळ्यातील सोन्याचे गंठण चार सोळा वजनाचे जु.वा.
२)७२,०००/-किमतीचे सोन्याची मिनी गंठण 18 ग्राम वजनाचे जु.वा.
३)४०,०००/-रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण एक तोळा वजनाचे जु.वा.
४)१२,०००/-रुपये किमतीचे सोन्याची ठुशी तीन ग्रॅम वजनाची जु.वा.
५)४,०००/-रुपये-किमतीचे कानातील सोन्याचे फुले एक तोळा वजनाची जु.वा.
६)१२,०००/-रुपयेत्यात सोन्याचे ४ मनी व एक डोरले असे तीन ग्राम वजनाची जु.वा.
७)१,०००/--रुपये त्यात चांदीची ४ जोडवी दोन भार वजनाची जु.वा.
८) २,०००/--रुपये त्यात चांदीचे २ करदोळे व दोन वाळे असे चार भार वजनाचे जु.वा.
३,३९०००/--रुपयाचे येणेप्रमाणे चोरीस गेल्यास तरी तसे दिनांक ५/५/२०२५ रोजी सकाळी ११ ते ११/४५ वाजण्याचे दरम्यान माझे राहत्या घराचे कडी कुलूप तोडून आत मध्ये प्रवेश करून घरातील कपाटात ठेवलेले वरील वर्णनाचे व किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने कोणीतरी दोन अज्ञात चोरट्याने मुद्दाम लबाडीच्या इराद्याने स्वतःचे फायदा करिता चोरून नेले आहेत म्हणून माझी त्या दोन अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार आहे माझा जवाब संगणकावर तयार केला असून तो मी वाचून पाहिला असता तो माझे सांगणे प्रमाणे अशी तक्रार फिर्यादी दयानंद रामदास जाधव वय 39 वर्ष धंदा नोकरी राहणार सवतगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर मो.नं:-९६५७ ५२६ ०२६ यांनी अकलूज पोलीस ठाण्यात दिली असून या दोन अज्ञात चोरट्याविरुद्ध --भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस) २०२३ -३३१(३) भारतीय न्याय संहिता (बी एन एस)-३०५(a)-भारतीय न्याय संहिता (बी एन एस) ३(५) गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास तपास अधिकारी योगेश लंगोटे करीत आहेत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा