*सोलापूर ---प्रतिनिधी*
*आंबिद. बागवान*
*टाइम्स 45 न्यूज मराठी
दिलीप मानेच बाजार समितीचे मालक ; सुनील कळके बसले उपसभापतीच्या खुर्चीवर ; हसापुरे नेक्स्ट टाईम
सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चेअरमन पदी अपेक्षेप्रमाणे दिलीप माने यांनीच बाजी मारली आहे. उपसभापतीच्या खुर्चीवर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आपले समर्थक सुनील कळके यांना बसवले तर सुरेश हसापुरे यांना मात्र दोन वर्षानंतर संधी मिळणार असल्याचे समजले.
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवड रविवारी बाजार समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली सभापती पदासाठी केवळ दिलीप माने यांचा एकच अर्ज आल्याने त्यांच्या नावाची बिनविरोध घोषणा गायकवाड यांनी केली.
उपसभापती पदासाठी सुनील कळके यांचे एकमेव नाव आले त्यामुळे त्यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडीनंतर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते नूतन चेअरमन दिलीप माने यांचा तर आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते नूतन व्हाईस चेअरमन सुनील कळके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक मनीष देशमुख, रामप्पा चिवडशेट्टी व अतुल गायकवाड यांनी नूतन चेअरमन व व्हाइस चेअरमन यांना शुभेच्छा दिल्या. माने यांची निवड झाल्याचे समजताच बाहेर मुक्त गुलालाची उधळण करून कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा